म.गांधीचा सत्य आणि अहिंसेचा मंत्र जगाच्या कल्याणासाठी – प्राचार्य डॉ डी एच गहाणे

197

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.2ऑक्टोबर):-मोहनदास करमचंद गांधी या राष्ट्रपित्याने भारताला विनाशस्त्राने स्वातंत्र्य मिळवून दिले.स्वच्छता,सत्य आणि अहिंसेच्या बळावर जग जिंकता येते,हे दाखविले.लालबहाद्दूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान होते.’ जय जवान,जय किसान ‘ हा नारा देऊन त्यांनी देशवासियात चैतन्य निर्माण केले.आज ‘ जय जवान,जय किसान ‘ आणि सत्य व अहिंसा हा म.गांधीचा मंत्र जगाच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बोलत होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ डी एच गहाणे व मेजर विनोद नरड सरांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम,डॉ तात्या गेडाम, अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ असलम शेख, डॉ किशोर नाकतोडे, डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ प्रकाश वट्टी,डॉ योगेश ठावरी, डॉ अतुल येरपुडे,डॉ अरविंद मुंगोले, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा अभिजित परकरावार, डॉ मोहूर्ले,रोशन डांगे, घनश्याम नागपुरे,रुपेश चामलाटे इ.मान्यवरांनी प्रतिमेला पुष्प वाहून आपली आदरांजली अर्पण केली.या जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेच्या स्वयंसेवकांनी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान मोहिम राबविली.यात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मांनी केले तर यशस्वीतेसाठी डॉ खानोरकर,डॉ युवराज मेश्राम, प्रा धिरज आतला व रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.