ओबीसी समाजापर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ब्रह्मपुरीत ओबीसी जागर सभा 5 आक्टोबरला

152

🔹जागर सभेला जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे- प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र

✒️रोशन मदनकर,(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.2ऑक्टोबर):-केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत असतात.यातून त्या त्या समाजातील जनतेने योजनांचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबांचा विकास साधावा,पर्यायाने समाजाचा विकास होईल आणि देशाचा विकास संभव होईल,ही धारणा ठेवून सरकार योजना अंमलात आणण्यासाठी आग्रही असतो. मात्र त्या त्या समाजातील व्यक्तीला आपणासाठी सरकारने काय काय योजना केल्या आहेत. याची नीटशी कल्पना नसल्यामुळे योजना कागदावरच राहून त्या त्या समाजातील बांधव योजनांपासून कोसो दूर राहतात.

मोदी सरकार आणि राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांबरोबरच ओबीसी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र या योजनांची माहिती ओबीसी बांधवांना नसल्यामुळे त्यांना या योजनांचा अपेक्षित लाभ घेता येत नाही. हाच नेमका उद्देश ठेवून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांची “ओबीसी जागर यात्रेची” राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती पासून म्हणजेच दि. 2 ऑक्टोबर पासून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पासून सुरुवात होत आहे.

पक्षाचे वेळापत्रकानुसार ही ओबीसी जागर यात्रा ब्रह्मपुरीला दि. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा.होणार आहे. जागर यात्रेच्या स्वागतानंतर शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे सभेची आयोजन करण्यात येणार आहे.या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रदेश प्रभारी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र डॉ. आशिषराव देशमुख, प्रदेश अध्यक्ष ओबीसी मोर्चा महाराष्ट्र मा. संजय गाते, यात्राप्रमुख पूर्व विभाग मा.रवींद्र चव्हाण, यात्रा प्रमुख पश्चिम विभाग मा.गजानन कोल्हे इत्यादी मान्यवर उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.

तरी जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल दोनाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, जिल्हा महामंत्री भाजपा ओबिसी मोर्चा मनोज भूपाल, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे, महामंत्री सुभाष नाकतोडे, ओबीसी शहराध्यक्ष प्रा.डा. अशोक सालोटकर,प्रा. दिलीप जुमडे महामंत्री भाजपा ओबिसी मोर्चा ब्रह्मपुरी शहर,प्रा.रमेश गिरी महामंत्री भाजपा ओबिसी मोर्चा ब्रह्मपुरी शहर,प्रा.राजू भागवत महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी शहर,रितेश दाशमवार, मनोज वटे नगरसेवक, कार्यालय तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा.संजय लांबे इत्यादीने आवाहन केले आहे.