यशवंत आयडियल हॉस्टेल गंगाखेड च्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न

401

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2 ऑक्टोबर):-2023 रोजी गंगाखेड शहरातील यशवंत आयडियल हॉस्टेल यांच्यावतीने महात्मा गांधीजी जयंती व स्वच्छता ही सेवा अभियान निमित्य गंगाखेड शहरातील पोलीस स्टेशन परिसर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते होळकर चौक,होळकर चौक ते डॉक्टर लाईन रोड परिसर यशवंत आयडियल हॉस्टेल च्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 ते 10 पर्यंत या परिसराची स्वच्छता करून स्वच्छता ही सेवा पंधरवाडा व महात्मा गांधीजी जयंती साजरी करण्यात आली अभियानाची सुरुवात करताना सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन घेण्यात आले.नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक घोषणा देत जनजागृती करण्यात आली. शेवटी डॉक्टर लाईन परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या समोर स्वच्छता पंधरवाड्याचा शेवट करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी करण्यासाठी यशवंत आयडियल हॉस्टेल चे संचालक प्रा.विजय बाबर,सामाजिक कार्यकर्ते प्रा.जयपाल पंडित,प्रा.योगीराज बदने,शेषराव सातपुते,रामेश्वर भंडारवाड,राजेश चोरघडे,गणेश पांचाळ,आकाश वडजे आदींनी परिश्रम घेतले.