डिजीटल शिक्षणाचे महत्व या विषयावर राज्यस्तरीय सेमीनार संपन्न

115

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.4ऑक्टोबर):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर जि. चंद्रपूर येथे राज्यस्तरीय इन्पारटंट ऑफ डिजीटल एज्युकेशन अॅन्ड सायबर क्राईम अवार्ननेस इश्युस अॅन्ड चॅलेंजेस एक दिवशीय सेमीनार संपन्न झाला.

एपीआय अमोल घोड सायबर क्राईम तज्ञ गुन्हे शाखा नागपूर यांनी सायबर क्राईम जागृकता फिशिंग, स्निशिंग व विशींग या विषयावर तसेच शिक्षणा अभावी होणारे फसवणुकीच्या गुन्हयाबाबत व त्यापासुन कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा डॉ. चंद्रशेखर मालवीय यांनी डिजीटल शिक्षणाचे महत्व आणि आव्हान तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी समाजकार्य विद्यार्थ्यांचे कार्य या विषयावर मत व्यक्त केले. तसेच डॉ. नंदकिशोर भगत क्राईम आणि करेक्शनल या विषयावर आपले मत मांडले. सदर प्रसंगी संस्थाध्यक्ष केदारसिंगजी रोटेले, एक सिनेट मेंबर किरणताई रोटेले, प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर यांनी आपले मत व्यक्त केले.

तंत्रज्ञानाचा नकारात्मक प्रभाव समजुन घेण्य कोणत्याही डिजीटल फसवणुकीला बळी पडु नये यासाठी घ्यावयाची खबरदारी समजुन घेण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व सुषसंचालन डॉ. सुदर्शन खापर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश मिलमिले यांनी केले. मोठ्या उत्साहात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.