ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचा धरने आंदोलन

54

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4ऑक्टोबर):-राज्यात व देशात सुरु असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देशातील ओबीसी घटकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संविधान निर्माते परमपुज्य बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाची तरतुद संविधानात करुन ठेवली मात्र गेल्या 70 वर्षात सुद्धा इथल्या सत्ताधारी आणि कधीतरी सत्तेत असणाऱ्या विरोधी पक्षाच्या सरकारांनी ओबीसी आरक्षणातील न्याय मिळवुन दिला नाही.

यासाठी नेमण्यात आलेल्या काका कालेलकर व मंडल आयोगाच्या मार्फत ओबीसी घटकांना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात आला. पण देशातील मनुवादी प्रवृत्तीच्या काँग्रेस आणि भाजपा सरकारांनी त्यावेळेसच्या बहुजनवादी व्ही पी सिंगांचं सरकार पाडून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसाच तेवत ठेऊन फक्त खोट्या आश्वासनावर ओबीसी मतदारांना लुबाडून त्यांचं रक्त पिण्याचं काम या दोन्ही सरकारांनी केलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हि ओबीसी आरक्षणाची लढाई मागील 40 वर्षांपासून लढत आहेत.

मंत्रालयापासून ते रस्त्यावरची लढाई आजही बाळासाहेब आंबेडकर लढण्यास सक्षम आहेत. एकदा जर का राज्याची व देशाची सत्ता वंचितांच्या हातात आली तर बाळासाहेब आंबेडकर हि समस्या नक्कीच सोडवतील असा विश्वास आहे कारण ते बाबासाहेबांचे वंशज आहेत, तसेच कायद्यांचे अभ्यासक आहेत. म्हणुन हा कळीचा मुद्दा अत्यावशक समजुन वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्हपुरी च्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनातून शासनाकडे मागण्या करण्यात आल्या.

ओबीसींची जातवार जनगणना करून त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना एस सी/ एस टी प्रमाणे आरक्षण देण्यात यावे, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वसतिगृह निर्माण करून द्यावे व ओबीसी विध्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणास शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाराष्ट्र व केंद्र शासनाने सर्व विभागातील कंत्राटीकरण रद्द करून शासकीय नियमाने नोकरभरती करावी. अशा विविध मागण्या निवेदनातून SDO मार्फत शासनाला पाठविण्यात आल्या. केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा सुद्धा पक्षाच्या वतीने देण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि आयटी सेल प्रमुख लिलाधर वंजारी यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शन डॉ प्रेमलाल मेश्राम, ऍड मनोहर ऊरकुडे साहेब, सुखदेव प्रधान, राहुल सोनटक्के, प्रभुदास लोखंडे, प्रकाश सांगोळकर, एस एल पेडुलवार, यांनी केले. शिवाय सूत्रसंचालन अनिल कांबळे तर आभार नरेंद्र मेश्राम यांनी मानले.

यावेळी जि महासचिव शैलेन्द्र बारसागडे, हरिश्चंद्र चोले, प्रा अनिल कोडापे, डॉ विलास मैंद, उद्धव ठाकरे, केशव करंबे, नरहरी इन्कने, नारायण कांबळी, मोतीराम गिरडकर, प्रकाश चौधरी, दिलीप प्रधान, जयराम बगमारे, महादेव सोनकुसरे, नामदेव बोरकुटे, गिरीधर सुरपाम, अनंता मेश्राम, भारत मेश्राम, आदि अनेक कार्यकर्ते व आंदोलनकर्ते उपस्थित होते.