गंगाखेडच्या शिवभोजनात राशनच्या गहू तांदळाचा वापर

152

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8ऑक्टोबर):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने झुणका भाकर केंद्र बंद करून गरीब गरजूंना शिवभोजन योजना सुरुवात केली असता सुरुवातीला शिवभोजन चालकांनी नागरिकांना चविष्ट भोजन देऊन भोजनाचा दर्जा सुधारून दिला परंतु आज वर्तमान दिवसात गंगाखेड मध्ये शिव भोजनामध्ये राशन मधून देण्यात येणारे तांदूळ व गहू वापरून दहा रुपयांमध्ये शिव भोजन दिले जात आहे.

दहा रुपये देऊन शिवभोजन गरीब गरजूंसाठी असल्यामुळे एक वेळेस शिवभोजन घेतल्या नागरिक नंतर या शिवभोजन केंद्राकडे पाठ फिरवतांना दिसून येत आहे.दुसऱ्या दिवशी वापस येत नाहीत.शिव भोजन केंद्राच्या शिव भोजनाचा लाभ घेतलेले नागरिक यांना विचारले असता ” तुरीचे वरण चविष्ट असते, गव्हापासून बनवलेले चपाती व भात याची मात्र चवच लागत नाही.गरीब परिस्थितीमुळे नाईलाजाने कधीमधी हेच भोजन खावेच लागते “असे नाव न सांगण्याचे अटीवर ग्राहकाने सांगितले.