गंगाखेड तहसील मधून अखेर कोतवाला मिळाले नियुक्तीपत्र

518

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10ऑक्टोबर):-तहसील कार्यालयातून 18 जागांची कोतवाल पदभरती प्रक्रिया अंतिम निवड प्रतीक्षा यादी मध्ये अखेर काही दिवसात का होईना 18 कोतवालांना नियुक्त पत्र मा. उपविभागीय अधिकारी युवराज दापकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले.यावेळी तहसीलदार प्रदीप शेलार,सह नायब तहसीलदार सुनील कांबळे,नायब तहसीलदार केंद्रे,पेशकार बिलापट्टे सह सर्व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

नियुक्ती पत्रामध्ये ज्ञानेश्वर भोसले, सुग्रीव जाधव,हरिश्चंद्र पवार, कृष्णा जाधव,संजय जाधव,रवी सावंत, नर्सिंग चाटे,राहुल उबाळे गुरुलिंग रेवडकर,कृष्णा सोडगीर, सुनील चव्हाण,अंकिता शिरसाठ, संगीता चाटे,विशाल राऊत, रंगनाथ भोकरे,सीमा डांगे रामेश्वर चातरवाड,ऐश्वर्या पोळ इत्यादींना नियुक्त पत्र देण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर म्हणाले की,नवीन कोतवालांना शुभेच्छा देत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कामाचा पाठपुरावा करत राहावा.

या अगोदरचा इतिहास पाहता याच कोतवाल पदाचे कर्मचारी नायब तहसीलदार पर्यंत सुद्धा प्रमोशननी जाऊ शकले व यावर प्रमोशन करिता नवीन नियम सुद्धा असू शकतात ही भाव वेगळी परंतु नवीन कोतवालांनी मन लावून काम करावे व पुनश्च अभिनंदन केले.याप्रसंगी निवृत्तपत्र देताना सर्व अठरा कोतवालांचा तहसील कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला