खासदार हेमंत पाटील यांना अटक करून खासदारकी रद्द करावी..! अन्यथा तीव्र आंदोलन करणार

209

[आदिवासी कृती समिती उमरखेड यांचे राज्यपालांना निवेदन]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 10 ऑक्टोंबर):-आदिवासी कृती समिती उमरखेड यांचे वतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करून खासदारकी रद्द करावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना दि. 10 ऑक्टोंबर रोजी देण्यात आले.

यावेळी उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

निवेदनात दिनांक 4 ऑक्टोंबर 2023 रोजी एफ. आय.आर नंबर 0703वर दाखल गुन्ह्यावरून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करून खासदारकी रद्द करून कठोर शिक्षा करावी….! अशी मागणी केली आहे.

डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील अधिष्ठाता व अध्यापक डॉ एस. आर. वाकोडे यांना दिनांक 3 ऑक्टोंबर 2023 रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदर हेमंत पाटील रूग्णालयात जाऊन अधिष्ठाता यांच्या केबिन मधे 15 – 20 कार्यकर्त्यांसह जबरदस्तीने घुसून अधिष्ठाता यांच्या खुर्ची वर बसले व आरेरावी करून शिवीगाळ केली.

अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे हे आदिवासी समाजाचे आहेत हे त्यांना माहिती होते. त्यांनी जाणीपूर्वक डॉ. वाकोडे यांना संडास आणि बाथरूम साफ करायला लावली. एव्हढंच नाही तर त्या घटनेचा छायाचित्रण करून सामाजिक माध्यमावर प्रसारित केले.

आदिवासी समाजाच्या एव्हढ्या वरच्या स्तरावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला अशी हिन वागणूक देणाऱ्या आदिवासीद्रोही बेजबाबदार खासदारामुळे सर्व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या अशा कृत्याचा आम्ही आदिवासी बांधव निषेध करतो…!

अशा या सूडबुद्धी आणि समाजद्वेषी खासदारावर तात्काळ दखल केलेल्या गुन्हानुसार अटक करून खासदारकी रद्द करण्यात यावी.

यामुळे संबंधित आरोपीस तात्काळ अटक न केल्यास लोकशाही मार्गाने सर्व आदिवासी समाज बांधवातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील…!अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना देण्यात आले.यावेळी उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.