गंगाखेड येथील डॉ.आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अतिक्रमण हटवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण

232

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑक्टोबर):-नगर परिषद यांच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वेळोवेळी निवेदन दिले असूनही अतिक्रमण हटवले नाही त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 12 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर अमरन उपोषणास बसले आहेत.

गंगाखेड शहरांमध्ये नगरपरिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे डॉ.आंबेडकर चौकात चहूबाजूनी अतिक्रमण केल्यामुळे या परिसरात जयंती,अभिवादन, धम्मदीक्षा सोहळा,बुद्ध वंदना इत्यादी कार्यक्रम घेण्यास जागा अपुरी पडत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर चारही बाजूने अतिक्रमण असल्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई होत नाही त्यामुळेच कंटाळलेले आंबेडकर अनुयायी व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांनी नगरपरिषद प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.दरवर्षी नियोजित जयंती महोत्सव,अभिवादन सोहळे दरवर्षी असतानाही जागा अपुरी असल्यामुळे कार्यक्रम मोठा असल्यामुळे रस्त्यावर कार्यक्रम घ्यावा लागतो.

जागे अभावी मोठा कार्यक्रम रस्त्यावर होत असल्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे या बाबीची दखल नगरपरिषदेने लवकरात लवकर घ्यावी व अतिक्रमणाचा मुद्दा यावर नियोजित इस्टिमेट प्रमाणे कार्यवाही व्हावी असेही निवेदनात म्हटलेले आहे निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मनोहर व्हावळे,तालुकाध्यक्ष आकाश पारवे यांच्यासोबतच अमोल कांबळे,लक्ष्मण साबणे,लखन अण्णा साळवे,अनिल उजगरे, गजानन पारवे,इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत