राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्र आंधळे यांची नियुक्ती

184

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.14ऑक्टोबर):- मौजे आंधळेवाडी ता केज येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील रामचंद्र मल्हारी आंधळे सध्या आरोग्य विभागात कार्यरत असुन ते केज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोलीमाळी येथे कर्तव्य बजावत आहेत.

राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस एल चव्हाण व राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड यांनी रामचंद्र मल्हारी आंधळे यांची बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. रामचंद्र आंधळे यांना नियुक्तीपत्र देताना राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब तांदळे, राज्य सरचिटणीस कैलास हरकळ, राज्य कार्याध्यक्ष गणेश दहिफळे इत्यादींची उपस्थिती होती.

नियुक्तीपत्र देताना राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड यांनी रामचंद्र आंधळे हे बीड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी तसेच राज्यातील कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.रामचंद्र आंधळे यांची राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आरोग्य विभागातील प्रविण मोरे, श्रीकांत देशमुख, दत्तात्रय राउत, कल्याण थोरात, गोविंद गुळभिले, संजीवकुमार हांगे, सतिश मोराळे, सुभाष लाड, सतिश गित्ते यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

रामचंद्र आंधळे यांची राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी बंधुभगिनी कडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.