वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे विद्यापीठस्तरीय एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

77

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.14ऑक्टोबर):- वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संस्कृत विभाग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “NEP-2020 व बी. ए. भाग 2 संस्कृत विषयाची बदललेल्या अभ्यासक्रमा संदर्भात विद्यापीठस्तरीय एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा” उत्साहात संपन्न झाली.

सदर कार्यशाळेचे उदघाटन मा. श्री भास्करराव कुलकर्णी (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) यांचे शुभहस्ते झाले. बीजभाषक म्हणून मा. प्रा. डॉ. प्रकाश कुंभार (इंग्रजी विभाग प्रमुख, एम. एच. शिंदे महाविद्यालय, तिसंगी) यांनी NEP 2020 विषयी सखोल मार्गदर्शन केले. उदघाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री नंदकुमार बाटाणे (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) हे लाभले व त्यांनीही कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

      या उदघाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री अरुण पांडुरंग पाटील (काका) विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. अल्ताफहुसेन मुल्ला साहेब उपस्थित होते. समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी मा. प्रा. श्रीमती रुपाली वाडेकर होत्या तर अध्यक्षपदी मा. प्रा. श्री मनोज धावडे हे होते.
     बीजभाषक म्हणून मा. प्रा. डॉ. प्रकाश कुंभार म्हणाले कि, “नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन व जुने ज्ञान संपादित करून पुढील अनेक पिढ्यांना परिणामकारक शिक्षण देणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास केला तरच आजच्या काळात तो टिकेल. कौशल्यावर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे म्हणून येत्या काळात महाविद्यालये मल्टीस्टडीज होतील.”

उद्घाटक मा. श्री भास्करराव कुलकर्णी म्हणाले कि, संस्कृत हि सर्वात जुनी भाषा असून ९७ टक्के भाषांवर तिचा प्रभाव आहे. संस्कृत उच्चारणातून मेंदूची कार्यक्षमता वाढून वाणी शुद्ध होते.”उदघाटन समारंभाचे अध्यक्ष मा. श्री नंदकुमार बाटाणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ” या महाविद्यालयास शिक्षणाची समृद्ध व उज्वल परंपरा आहे. विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाची स्वतंत्र ओळख असून गुणवत्तेमध्ये अग्रेसर आहे. अशा कार्यशाळा आयोजित करून शिक्षक देखील अपडेट राहतात. या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी करता येतो.”

   या समारंभाचे स्वागत महाविद्यालयाच्या जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले.  प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीमती एम. ए. शिंदे यांनी केले. प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय प्रा. डॉ. आर. आर. थोरात यांनी करून दिला तर आभार प्रा. डॉ. डी. के. नगरकर यांनी मानले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एस. पी. पाटील यांनी केले.

या कार्यशाळेत संस्कृत विषयातील नीती साहित्य (पेपर ६), साहित्य समीक्षा (पेपर -५), संकृत नाट्यदर्पण( पेपर-३), गीताधीन व्यक्तिमत्व विकास (पेपर -४) इत्यादी विषयावर सखोल चर्चा झाली.  या कार्यशाळेस प्रा. श्रीमती रुपाली वाडेकर, प्रा. श्री. अनंत निकम, प्रा. रचना शाह, प्रा. मनोज धावडे, प्रा. श्रीमती गुणकली कुलकर्णी,  प्रा. श्रीमती पायल शेळके, प्रा. श्रीमती दीक्षा मोरे, प्रा. अनिरुद्ध किल्लेदार, प्रा. श्रीमती स्नेहाराणी नेरुरकर, प्रा. मयूर धारक आदी साधनव्यक्ती सहभागी झाले होते.विविध महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.