विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचारावर वाटचाल करावी-विश्वास मोहिते

81

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.14ऑक्टोबर):- वाचनाने विद्यार्थी घडतो, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपून विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी बरोबर ज्ञानार्थी झाले पाहिजे. आणि विद्यार्थी ज्ञानार्थी होण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारावरती वाटचाल करावी असे मत आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी व्यक्त केले.

सुपने येथील केदारनाथ शिक्षण संस्थेच्या श्री केदार हायस्कूल सुपने या ठिकाणी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन आणि हात धुवा दिन साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक गुरवसर पाडळी केसेचे सामाजिक कार्यकर्ते साजिद पटेल,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मोहिते म्हणाले,डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी संघर्षातून स्वतःची सामाजिक आणि राजकीय प्रगती केली. सर्वसामान्य नागरिक ते देशाचे राष्ट्रपती हा त्यांचा संघर्षमय प्रवास डोळ्यासमोर ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश प्राप्ती करणे कदापि अवघड नाही. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपून उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल केली पाहिजे असेही विश्वास मोहिते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक श्री कुंभार सर यांनी केले तर आभार रणसिंग सर यांनी मानले. कार्यक्रमास सुहास गुरवसर भिंगारदिवेसर,झंजे सर, कुंभारसर, शेडगेसर, श्रीमती थोरात मॅडम, शेवाळेसर, चव्हाण सर,सावंतसर, नलवडेसर,श्रीमती माळीमॅडम, पाटीलमॅडम, रणशिंग सर सह सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.