महिलांची घुसमट थांबवण्यासाठी सक्षम चळवळ उभे राहणे गरजेचे : ॲड. करुणा विमल

150

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.14ऑक्टोबर):-भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या जोरावर आज महिला पुढे आल्या विकसित झाल्या, अनेक उंच शिखरे तिने प्रादाकांत केले. असे असले तरी आज तिची जात, धर्म, लिंगभेद आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे जी घुसमट होत आहे ती थांबवण्यासाठी महिलांची सक्षम चळवळ उभे करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गोलमेज परिषदेच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी केले.

त्या आम्ही भारतीय महिला मंच आयोजित स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी, महामातांच्या विचारांचा वेध घेण्यासाठी, मानवतावादी, समतावादी, स्त्रीवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महिलांनी, महिलांसाठी, फक्त महिलांचा मोठा सहभाग असलेल्या निवडक महिला प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेत बोलत होत्या.

या गोलमेज परिषदेमध्ये पुढील ठराव करण्यात आले.
1) महिलांना स्वतंत्र देण्यात येणाऱ्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. 2) सरकारने मुलींकरिता प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत करावे. 3) महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्याकरता स्वतंत्र व सक्षम महिला पोलीस यंत्रणा उभी करावी. 4) महिलांचे ढासळते आरोग्य पहाता ते सुधारण्यासाठी स्वतंत्र व उच्च दर्जाची आरोग्य यंत्रणा उभी करावी. 5) महाराष्ट्रासह देशातील सर्वच छोट्या मोठ्या मंदिरांमध्ये सरकारने पगारी महिला पुजारी नेमावेत. 6) ज्या महिलांना उद्योग करायचे आहेत सरकारने त्यांना बिनव्याजी व विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे.

भारतीय संविधानाची प्रास्ताविकेचे वाचून विजया कांबळे, अनिता काळे यांच्या हस्ते गोलमेज परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.परिषदेला निमंत्रक सन्माननीय उपस्थिती अनिता काळे, प्रा. डॉ. स्मिता गिरी, प्रा. डॉ. शोभा चाळके, रूपाताई वायदंडे यांच्यासह निती उराडे, विमल पोखर्णीकर, डॉ. सुजाता नामे, अनिता गायकवाड, मालती कांबळे, हिराताई देशमुख, वृषाली कवठेकर, नुतन गोंधळी, लक्ष्मी कांबळे, कमल कवठेकर, संगिता लोंढे, पद्मा कांबळे, वैशाली लोंढे, वर्षा सामंत, जयश्री नलवडे, आयेशा काझी, वर्षा कांबळे, वासंती मिसाळ, पूनम मेधावी, प्रा. प्रेरणा कवठेकर, श्रीदेवी कांबळे यांच्यासह विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.स्वागत व प्रास्ताविक स्वागताध्यक्षा डॉ. निकिता चांडक, सूत्रसंचालन नीती उराडे यांनी केले तर आभार अनिता गायकवाड यांनी मानले.