भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल वतीने राजेश ढोले यांचा सत्कार

257

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15ऑक्टोबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा व तालुका शाखा आणि समता सैनिक पुसद यांच्या वतीने रिपब्लिकन वार्ता न्यूज चैनलचे विदर्भ उपसंपादक राजेशजी ढोले यांची नुकतीच युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुसद ग्रामीण तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय बौध्द महासभा पुसद शहराध्यक्ष ल.पु.कांबळे यांच्या निवासस्थानी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय मानकर यांनी शुभेच्छापर गीत गाऊन अभिनंदन केले.राजेश ढोले यांचा पुष्पगुच्छ, शाल, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ल.पु.कांबळे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या .

याप्रसंगी ल.पु.कांबळे, सत्कारमुर्ती राजेश ढोले, तालुकाध्यक्ष भारत कांबळे, तुकाराम चवरे, प्रल्हाद खडसे, माजी जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे, मुंकिदा ढोले, कमलेश पाटील, मिलिंद लोखंडे, संजय मानकर, अरविंद हनवते, भोजराज कांबळे, विनोद कांबळे, प्रेमदास खडसे, किसन धुळे, बोराडे, पत्रकार ज्ञानेश्वर मेटकर, कैलाश श्रावणे , विजय निखाते, बाळासाहेब ढोले तसेच इत्यादी भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद खडसे यांनी केले तर आभार भोलेनाथ कांबळे यांनी मानले.