आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्या!

150

[आंतरराष्ट्रीय अन्न दिवस सप्ताह विशेष]

अन्नाची नासाडी हा फक्त सामाजिक प्रश्न नाही तर पर्यावरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अन्नाची नासाडी रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलले गेलेच पाहिजे. गरज आहे तितकेच अन्न शिजवले गेले पाहिजे. रियुज म्हणजे वस्तू दीर्घकाळ वापरा. रिसायकलिंग म्हणजे जुन्या वस्तूला नव्या वस्तू तयार करण्यासाठी वापर करा. या तीन तत्वावर अन्नाची नासाडी थांंबून प्रत्येकापर्यंत अन्न पुरेशा प्रमाणात पोचेल. कारण अन्नाची बचत ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायला हवे. असा हा मार्गदर्शक आणि अनुकरणीय लेख एक शेतकरीपुत्र- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांचा आहे, जरूर वाचा…

अन्नाचे कंपोस्टिंग करणेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. अन्न बचतीसाठी स्टोरेज वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. गरज आहे तितकेच अन्न घ्या. तुम्ही जे पिकवता ते लगेच खाऊ शकत नाही. ते अन्न फ्रीझ करा किंवा उरलेले अन्न दुसऱ्यांंच्या कामी पडू शकते असाही विचार करा. वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा. वस्तू दीर्घकाळ वापरता यायल्या हव्या. अन्नाचे कंपोस्ट़िंग करा. म्हणजे अन्नातील पोषण तत्व जमिनीत रूजवा. याच मातीतून स्वतःच्या भाज्या आणि फळे पिकवा. रिसायकलिंग म्हणजे जुन्या वस्तूला नव्या वस्तू तयार करण्यासाठी वापर करा. या तीन तत्वावर अन्नाची नासाडी थांंबून प्रत्येकापर्यंत अन्न पुरेशा प्रमाणात पोचेल. कारण अन्नाची बचत ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायला हवे. गरीब देशात पुरेसे अन्न मिळत नाही. जगात अजूनही काही गरीब देश आहेत. जिथल्या लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. ती मोठ्या कष्टाने जगतात. इंटरनेटवर महत्त्वाच्या आणि अधिकृत वेबसाईटवरून माहिती घ्याल तर भूकबळींची आकडेवारी, कुपोषण आणि पर्यावरणातील बदल यावरूनच अन्न बचत किती आवश्यक आहे, हे सहज समजेल. म्हणूनच शास्त्रांत अन्नास “पूर्ण ब्रह्म” संबोधले गेले. ते जसे खावू, तशी आपली मनोवृत्ती बदलते.

यासाठीच जागतिक अन्न दिन दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना प्रथम १९४५ मध्ये झाली. उपासमारीवर कारवाई करणे हा या संघटनेचा उद्देश होता. त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. अन्न दिनानिमित्त अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराची गरज याबाबत लोकांना जागरुक केले जाते. कोणत्याही शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याची तसेच चवीची काळजी घेण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे अत्यावश्यक ठरते. ही संस्था अन्न सुरक्षा आणि पोषक तत्वांवर काम करते. संस्थेच्या प्रयत्नांमुळे १९७९ मध्ये जागतिक अन्न दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दि.१६ ऑक्टोबर १९८१पासून जागतिक अन्न दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटने- फुड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनाइजेशन- एफएओने जागतिक अन्न दिन हा उपक्रम सुरू केला. सन १९८१मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा केला गेला होता. त्यानंतर हा दिवस दरवर्षी जगभरात १५०हून अधिक शहरांमध्ये साजरा केला जातो. उपासमारी पिडीतांना मदत करणे तसेच अन्नाचे महत्व सर्वांना सांगणे हे उद्देश जागतिक अन्न दिनाचे आहेत. “आमची कृती आमचे भविष्य- चांगले उत्पादन, चांगले पोषण, चांगले वातावरण आणि चांगले जीवन” अशी सन २०२१ सालच्या जागतिक अन्न दिनाची थीम होती. सन १६ ऑक्टोबर १९४५ साली एफएओची स्थापना झाली. ही संघटना कृषी आणि खाद्य सुरक्षा या गोष्टींवर काम करते. या संघटनेचे मुख्य कार्य कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे आहे. याच अन्न आणि कृषी संघटनेने जगभरातील उपासमार आणि कुपोषणाने ग्रस्त लोकांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी जागतिक अन्न दिन साजरा करण्याची घोषणा केली. सन १९८१ साली अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक अन्न दिनाची स्थापना केली. दरवर्षी ही संस्था जागतिक अन्न कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीद्वारे अन्नसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम करते. संस्था या दिवसासाठी विशिष्ट थीम ठरवते. सन २०२२ वर्षी जागतिक अन्न दिनाची थीम “कुणालाही मागे सोडू नका” ही होती. आपण उत्पन्न घेतले, म्हणून कुण्या गरजवंतास न देता ते आपणच गरजेपेक्षा अधिक खाल्ले, तर अपाय होऊ शकतो. अजिबात अन्नाचा त्याग केला, तर प्रकृती ढासळत जाऊन शेवटी जगाचा निरोप घ्यावा लागतो. त्यामुळेच “अन्न तारी, अन्न मारी!” असे शहाणे लोक म्हणतात.

अन्नाची नासाडी थांबवण्याचे हे आहेत तीन सोपे उपाय- अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी न्यू्ट्रीशिएनालिस्ट लवनीत बोरा यांनी काही पर्याय सुचवले. अनेकजण सांगतात त्यापेक्षा अन्न नासाडी खूप मोठी समस्या आहे. आपल्या चुकीच्या सवयीमुळे नैसर्गिक स्त्रोतांवर अतिरिक्त ताण आणतो. यामुळे पर्यावरणाला नुकसान पोचते. अन्नाची नासाडी म्हणजे फक्त अन्न वाया घालवणे नव्हे तर धान्य, फळ-भाज्या पिकवण्यासाठी लागलेली मजूरी, श्रम, गुंतवणूक आणि स्त्रोतांचे नुकसान आहे. थोडक्यात काय तर अन्न वाया घालवणे म्हणजे पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान आहे. होय या आपल्या बेजबाबदारपणामुळे आपण ग्रीन हाऊस उत्सर्जन आणि क्लायमेट चेंजसाठी जबाबदार ठरतो. हे थांबवण्यासाठी गरजेपेक्षा जास्तीचे म्हणजे अन्नाचा अनावश्यक साठा वा अतिरिक्त अन्न विकत घेणे बंद करायला हवे.

जगातील अनेक देश सध्या दारिद्र्यरेषेखाली आहेत. या देशांतील लोकांना संतुलित आहार मिळत नाही. त्यामुळे बहुसंख्य जनता कुपोषित होत आहे. संतुलित आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. कुपोषणाची समस्या दूर करणे आणि लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराची जाणीव करून देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्न दिनाचे महत्व असे, की गरीब लोकांना उपासमारी, कुपोषण या समस्यांचा सामना करावा लागतो. संतुलित आहार न घेतल्याने अनेकांचं कुपोषण होते, परिणामी मृत्युही ओढवतो. याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि ही समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने केले जाते. त्यामुळे जागतिक अन्न दिन हा खुप खुप महत्वाचा आणि अन्नबचत शिकविणारा आहे, हे पक्के मनात ठसवावे. हीच एक सार्थ अपेक्षा या लेखप्रपंचाद्वारे केली आहे.

✒️एक शेतकरीपुत्र:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- 9423714883