नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सत्कार सोहळा संपन्न

155

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17ऑक्टोबर):- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका ब्रम्हपुरी, मुख्याध्यापक संघ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तालुका ब्रम्हपुरी, आणि जुनी पेन्शन हक्क संघटन ब्रम्हपुरी यांचे वतीने नागपूर विभागाचे शिक्षक आमदार आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह श्री सुधाकरराव गोविंदराव अडबाले यांचा सत्कार सोहळा स्थानिक स्वागत मंगल कार्यालय सभागृह ब्रम्हपुरी येथे संपन्न झाला.

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विष्णुजी तोंडरे, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ब्रम्हपुरी, प्रमूख अतिथी म्हणून श्रीहरी शेन्डे जिल्हा कार्यवाह विमाशि संघ चंद्रपूर, सुनिल शेरकी जिल्हा उपाध्यक्ष विमाशि संघ चंद्रपूर, अजय लोंढे जिल्हा कार्यवाह विमाशी गडचिरोली, जगदिश ठाकरे उपाध्यक्ष,
जिल्हा मुख्याध्यापक संघ चंद्रपूर भाऊराव राऊत, रामदास आलेवार , धनंजय राऊत संघटक विमाशी चंद्रपूर , प्रा बालाजी दमकोडवार, अनंत ढोरे जुनी पेशंन हक्क संघटन, प्रविण नाकाडे , हेमंतकुमार किंदर्णे, भोजराज खोब्रागडे आणि अन्य मान्यवर तालुक्यातील मुख्याध्यापक , शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ह्यावेळी शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सत्कारमुर्ती सुधाकरराव अडबाले यांनी सत्काराला उत्तर देतांना सर्वच संघटना चे आभार मानून सदैव शिक्षकाच्या पाठिशी उभे राहून शेवट पर्यंत अन्यायकारक धोरणाविषयी सभागृहात आवाज उठविण्याचे आश्वासन देऊन जुनी पेन्शन चा लढा वोट फार ओपिएसच्या निर्णयास सक्रिय पाठींबा दर्शविला, सरकारचे कंत्राटीकरण मराठी शाळा बंद करण्याचा धोरणाचा निषेध नोंदवून तीव्र लढा उभारण्यात येईल सर्व संघटनानी ह्या लढ्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमाशि तालुका अध्यक्ष भोजराज खोब्रागडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी ठेंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र हटवार तालुका विमाशि सचिव यानी मानले कार्यक्रम यशस्वी ऋकरण्यासाठी रूपेश पुरी, अतुल कानझोडे किशोर वानखेडे संजय हटवार, दाते, दिपक यादव , साखरे, मनोज चौके, सचिन उरकुडे तसेच तिन्ही संघटनेने प्रयत्न केले.