आयटा शिक्षकांसाठी आदर्श प्लेटफार्म

135

[अतिक शेख शामिल होण्याचे शिक्षक परिषदेत आवाहन]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 20 ऑक्टोंबर):-शिक्षकांनी नव शिक्षणाच्या आणि अध्यापनाच्या उद्दिष्टाचा योग्य तो निश्चय करावा. जागरूकता, शिक्षकांचा नैतिक दृष्टिकोन आणि विद्यार्थी-विकासाचे प्रयत्न यांचेशी जुळून संघटनेत सामील होऊन समाजात परिवर्तनाचा आणि सर्जनशील क्रांतीचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करावा…!

असे सांगत आयटा शिक्षकांसाठी एक आदर्श प्लॅटफॉर्म असल्याचे सांगत AIITA च्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहन आखिल भारतीय आर्दश शिंक्षक संघ (आयटा) चे जनरल सेक्रेटरी अतीक खान यांनी केले.

ते ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (AIITA) तर्फे ज्ञानवर्धक, प्रतिभांचे पोषण, परिवर्तनकारी समाज या विषयावर देशव्यापी अभियानांतर्गत गोल्डन फंक्शन हॉल येथे घेण्यात आलेल्या शिक्षक परिषदेत बोलत होते.

शिक्षक परिषदेच्या अध्यक्षस्थानी इनायतउल्ला खान जनाब होते . प्रमुख पाहुणे शेख अतीक सर ,जनरल सेक्रेटरी AIITA महाराष्ट्र ,अब्दुल समद जिल्हाध्यक्ष AIITA यवतमाळ, समीर अहेमद जिल्हा उपाध्यक्ष, साजीद मिर्झा जिल्हा सचिव, नासीर खान अध्यक्ष पुसद,मो. फिरोज आशाजी शहराध्यक्ष उमरखेड,नासीर खान स्थानिक सचिव आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मौ रउफ नदवी, मुक्ती इनाम उल्ला, मुफ्ती आबिद, सै. युसुफ, यांनी विचार आपले मांडले .शहरातील सर्व उर्दू – मराठी सेवा निवृत्त शिक्षकांचा सम्मान करण्यात आला.

या प्रसंगी न.प. अ. गफुर शहा उर्दु शाळे चे मुख्याध्यापक राहत रोशन अन्सारी यांना पनवेल येथे नुकतेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचे या प्रसंगी मुव्हमेंट फॉर पीस अँन्ड जस्टीस , शादी कमिटी आणि आयटा तर्फे सम्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अलहाज नासीर सर यांनी प्रास्ताविक राहत अन्सारी यांनी तर आभार प्रदर्शन समीर अहेमद यांनी केले.