ठाणेदारांच्या विरोधातील अजित सुकारे यांच्या उपोषणाचा पोलीस पाटील संघटनेने केला निषेध

169

🔹जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन;तळोधीवासीय जनता तथा तं मु सं समितीने उपोषणाचा डाव हाणून पाडला

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-९६८९८६५९५४

नागभीड(दि.30ऑक्टोबर):-नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 42 गावांत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून ठाणेदारांचा यामागे आशिर्वाद असल्याचा आरोप लावत चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथील अजित दुर्गादास सुकारे ,सामाजिक कार्यकर्ता यांनी उप मुख्यमत्र्यांपासुन तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ठाणेदारांची तक्रार करून शनिवार दिनांक 28/10/2023 रोजी तळोधी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला. मात्र तळोधी(बा.)वासिय जनता व तं.मु.स.समिती यांनी तातडीने पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन उपोषणाचा बेत हाणून पाडला. तसेच तळोधी (बा.)परिसरातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने सुकारे यांच्या उपोषणाचा विरोध व निषेध करीत त्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना,तळोधी (बा.)यांनी पोलीस अधीक्षक, मा, रवींद्र सिंह परदेशी,चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,तळोधी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार मंगेश भोयर हे रूजू झाले तेव्हापासुन तळोधी पोलिस स्टेशन अंतर्गत 42 गावांमधील काही गावातील अवैध धंद्यांवर अंकुश लागले असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.शिवाय अवैध दारू, वाळू तस्करी,सट्टा मटका,जुगार आदी अवैध व्यवसाय बंद करण्यात आले आहे.त्यामुळे परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित आहे.ठाणेदार मंगेश भोयर हे एक कर्तव्यदक्ष ठाणेदार म्हणून ओळखल्या जातात .

मात्र हेतूपूरस्कर व द्वेषभावनेतुन चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथील अजित सुकारे यांनी ठाणेदारांवर निरर्थक आरोप लावीत त्यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांतून व निवेदनाद्वारे निलंबनाची मागणी करून तळोधी परिसरातील गावांतील शांतता व सुव्यवस्था भगं करण्याचे काम केले आहे. आणि सदर मागणीच्या अनुषंगाने शनिवारी उपोषणास बसण्याचा बेत आखला.मात्र गावातील शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून गावकऱ्यांनी व तंटा मुक्त समितीने उपोषणाला विरोध दर्शवुन ठाण्यात निवेदन सादर केले. हो उपोषणाचा बेत हाणुन पाडला.तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटनेने उपोषणाचा निषेध करीत सुकाळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत पोलीस अधीक्षक,चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे रविंद्र बोरकर,दौलत मस्के,मधुकर घुगुस्कर,विनोद सयाम,अपूर्वा मेश्राम,शीला नेवारे,शितल इचकापे,जिवन बोरकर,राजेंद्र सडमाके,हितेश घुगुस्कर,जागृती बोरकर,लता लाडे,लीपिता गुरनुले,सुरेश सडमाके आदीं उपस्थित होते.

*उपोषणाचा डाव नागरिकांनी हाणून पाडला.*

जिल्हाभरात व इतरत्र तळोधी गावाची व तळोधी पोलीस स्टेशनची खूप बदनामी करीत या परिसरात कायदा व सुव्यवस्था पाळल्या जात नसल्याचे चित्र सुकारे यांनी लोकांसमोर उभे केले आहे.मात्र सदर व्यक्तीच अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

दरम्यान उपोषणाच्या आड ठाणेदारांची बदली करून बंद असलेले अवैध व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचा बेत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.आणि उपोषणाला बसून ठाणेदार व तळोधीची सुरळीत चाललेली कार्यपद्धती विस्कळीत करण्याचा या व्यक्तीद्वारे प्रयत्न होत आहे.त्यामुळे गावातील नागरिक,तं मु स अध्यक्ष सचिन मदनकर व तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील संघटनेने एकवटून उपोषणाचा डाव हाणून पाडला आहे.