उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समितीच्या वतीने दिवाळी फराळ विक्री व प्रदर्शनी

126

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.7नोव्हेंबर):-पंचायत समिती चिमूर आवारात दिवाळी फराळ पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दिवाळी फराळ प्रदर्षानीचे उद्घाटन राठोड साहेब (संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर) व कांबळे (कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती चिमूर) यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.

दिवाळीनिमित्त विविध वस्तूची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ, आकाश दिवे, उटणे यांची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्साह वाढवावा व त्यांच्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन श्री. राठोड साहेब संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून यातील अनेक महिला नाविन्यपूर्ण वस्तूची निर्मिती करतात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध खाद्यपदार्थ व सजावटीच्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत.

पंचायत समिती चिमूर परिसरात दिनांक 6 नोव्हेबर ते 10 नोव्हेबर या पाच दिवसीय कालावधीमध्ये दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत.

या पाच दिवसांमध्ये विविध वस्तू विक्रीस असणार आहेत. भेट देणाऱ्या ग्राहकांनी ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात जेणे करून ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल असे आवाहन राजेश बारसागडे (तालुका अभियान व्यवस्थापक) यांनी केले.

या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी मेघदीप ब्राम्हणे, कु. रजनी खोब्रागडे, हेमचंद बोरकर, ईश्वर मेश्राम, सुधीर ठेंगरी, दिपाली दोडके, स्वप्ना उराडे, पुंडलीक गेडाम, नितेश मेश्राम, किरणकुमार मेश्राम, नितेश संगेल कु. प्रीती डोंगरे उमेद टीम यांनी परिश्रम घेतले.