महात्मा जोतीराव फुले यांचा 133 वा स्मृतिदिन कार्यक्रम साजरा

98

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

ब्रम्हपुरी :-
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले,स्मारक समिती पिंपळगाव (भोसले ) त.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर यांचे कडून आयोजित दि.28 नोव्हेंबर ला सकाळी 10 वा. राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा 133 वा स्मृतिदिन कार्यक्रम मा.ओमप्रकाशजी बगमारे मुख्या.महा.विद्या.पिं.यांचे अध्यक्षतेखाली , उपाध्यक्षा सौ.भारतीताई भा.लांजेवार माजी सरपंच ग्रा.पं. पिं.,विशेष अतिथी_जगदिशजी बनकर उपसरपंच ग्रा. पं. पिं., अमृतजी नखाते शिवसेना प्रभारी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र ,देविदासजी गडे धान्य व्यापारी पिं.व इतर मान्यवर.प्रमुख अतिथी_ रामलालजी लांजेवार सर,जीवनजी सहारे सा.कार्य.,सौ.तोरणाबाई बगमारे व इतर सदस्य ग्रा. पं. पिं., शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद म. वि. पिं. , शिक्षकवृंद जि. प. प्रा. शा. पिं. , इतर मान्यवर, म.फुले वॉर्डातील व ग्रामस्थ पुरुष, महिला, विद्यार्थी, बालगोपाल विशेष करून मा. वयोवृद्ध तुळशीरामजी मेश्राम दाम्पत्य सह बहुसंख्यचे उपस्थितीत फुले दाम्पत्य जयघोशाने कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी रामलाल लांजेवार सर (से. नि.व.स.)नवेगाव बांध यांच्याकडून जन्मदाते स्व. आई गंगाबाई व बाबा विठोबा यांचे स्मरणार्थ म.विद्या. पिं. येथील शालेय परीक्षा 2023 मध्ये वर्गातून गुणानुक्रम प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना व गरुडझेप सार्वजनिक वाचनालय पिंपळगाव करिता संचालक पुरी सर यांच्याकडे आदरणीय, जोतीराव व सावित्रीबाई या फुले दाम्पत्य यांचे जीवनचरित्र वरील विविध पुस्तक साहित्य व स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रमिक पुस्तक साहित्य कार्यक्रमाचे मान्यवर यांचे शुभ हस्ते सस्नेह भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवातीस राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा व फोटो यांना अध्यक्ष व मान्यवर यांचे शुभ हस्ते पुष्प हार वाहून व पुष्प वर्षाव करून फुले दाम्पत्य जयघोष करून ,परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .कार्यक्रम प्रसंगी रामलाल लांजेवार यांनी प्रास्ताविक, पुरी सर व इतर मान्यवरांचे तसेच बागमारे मुख्याध्यापक यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन व प्रशांत लांजेवार यांनी संचालन व आभार मानले. सायंकाळी सहभोजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.