पारधी समाजातील तीन अल्पवयीन बालिकांवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात धरणगावात मुक मोर्चा व प्रशासनास निवेदन…

88

 

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

[ निवेदन सादर प्रसंगी आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जमादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व्ही डी पाटील, जेष्ठ नेते सी के पाटील, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र वाघ आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत म्हणाले की, सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून मा.मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी लक्ष देऊन, शासनस्तरावरून चौकशी करून मागासवर्गीय भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करीत निषेध नोंदविला. ]

धरणगाव : धरणगाव तालुक्यातील आदिवासी पारधी समाज संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा शिवसेना, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सर्व संघटनांनी एकत्र येत आदिवासी भगिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पारधी वाडा येथून शहरातील मुख्य मार्गद्वारे तहसिल कार्यालयावर असंख्य प्रमाणात मुकमोर्चा काढण्यात आला.

१) बुलढाणा जिल्ह्यातील खर्डे बुद्रुक येथे सहा वर्षाच्या बालिकेवर ५० वर्षीय नराधमाकडून झालेल्या बलात्काराची घटना, २) मालेगाव दाभाडे येथील आठ वर्षीय बालिकेवर बलात्काराची घटना, ३) नांदुरा येथे नऊ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार या तिन्ही घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे. या तिन्ही घटनेचा निषेधार्थ संबंधित आरोपींवर बॉक्स कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करावा व मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ऍट्रॉसिटी गुन्ह्याची नोंद होऊन फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि संपूर्ण गुप्तता पाळून या प्रकरणाचा वेगाने तपास करावा, त्याचप्रमाणे तिन्ही अल्पवयीन बालिकांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. सदर तिन्ही घटना प्रकारात स्थानिक नराधमांचे नातलग पिढी त्यांच्या घरी जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. पीडितांच्या परीवार, नातलग, पीडित बालिका, आणि त्यांचे आई- वडील प्रचंड तणावाखाली आहेत. अश्या विविध मागण्यांसाठी धरणगाव तालुक्यातील आदिवासी पारधी समाज संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा शिवसेना, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सर्व संघटनांनी एकत्र येत धरणगाव तहसिलचे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन सादर करीत मा.शासन, प्रशासनाकडे सदरील मागणी करण्यात आली.
निवेदन सादर प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनंत परिहार, उबाठा शिवसेना प्रमुख भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, नगरसेवक भिमराव धनगर, दिनेश पाटील, रामचंद्र माळी, रावसाहेब पाटील, गणेश सोनवणे, समाजाचे जेष्ठ नेते गंगाराम साळुंके, जितेंद्र चव्हाण, जयेश पारधी, विकास पारधी, सुनील चव्हाण, सुधाकर साळुंखे, मुकेश चव्हाण, पंकज पवार, दशरथ पारधी, संतोष साळुंखे, सुरेश पवार, शाम पवार, निलेश पवार, मयूर भामरे आदींसह असंख्य बंधू भगिनी उपस्थित होते. मूकमोर्चा दरम्यान पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे सो, यांच्यासह पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.