डॉ.आंबेडकरांच्या विद्यार्थी जीवनातील आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारणे आवश्यक – प्रा.अरुण बुंदेले श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन.

64

 

अमरावती (प्रतिनिधी )
” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजींनी बाळ भीमावर शिक्षण,शिस्त,स्वावलंबन,
स्वाभिमान व कठोर परिश्रम ही मूल्ये रुजविली होती.वडिलांनी केलेल्या या मूल्यांची जपणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर केली व स्वतःसोबतच भारतीय समाज बांधवांचेही जीवन घडविले.एल्फिन्स्टन शासकीय हायस्कूलमध्ये अस्पृश्यतेमुळे आलेल्या सर्व संकटांवर मात करून मनावर कोणताही परिणाम होऊ न देता विद्यार्थी जीवनापासून सतत अठरा अठरा तास अभ्यास केला. त्यांच्या या दीर्घ बौद्धिक परिश्रमामुळे विद्यार्थी जीवनात जे यशोशिखर त्यांनी संपादन केले त्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनातील आदर्श आजच्या प्रलोभनाच्या युगातील विद्यार्थ्यांनी समोर ठेवला पाहिजे, त्यांच्यासारखी मूल्ये जपली पाहिजे तेव्हाच आजचा विद्यार्थी प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. “असे विचार प्रमुख वक्ते समाजभूषण प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे सर्वोदय कॉलनी,अमरावती येथील संस्थेच्या कार्यालयात दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,भा रतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल भागवतकर (अध्यक्ष श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था,अमरावती.) प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले प्रमुख अतिथी श्री कृष्णा मोहोकर,श्री पुरुषोत्तम वनस्कर, श्री दिनेश भागवतकर, श्री गणेश भागवतकर,श्री रमेशराव भटकर, श्री संजय खंडारे,श्री सुनील खंडारे,श्री प्रभाकर बुंदिले,श्री मधुकरराव विरुळकर,अमृतराव ठाकरे होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.

कवी व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी ” निखारा ” या त्यांच्या परिवर्तनवादी काव्यसंग्रहातील ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” या वंदनगीताचे गायन करून सर्वांना मंत्र मुग्ध केले.

बॉक्स

अध्यक्षीय भाषणात श्री अनिल भागवतकर म्हणाले की, ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विचारांची आज गरज आहे. बाबासाहेबांचे संविधान आणि तत्त्वज्ञानच भारताला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकते.” असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन श्री कृष्णा मोहोकर तर आभार श्री गणेश भागवतकर यांनी मानले.
कार्यक्रमाला सौ.शीतल कृष्णा मोहोकर,कु.पूर्वा कृष्णा मोहोकर, श्रीमती मनकर्णाबाई देविदासराव मोहकर,श्री आटोले तथा समाजबांधव व फुले-शाहू- आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.