डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा च्या पाठीमागील अतिक्रमण हटवले

108

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11डिसेंबर):-शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून गंगाखेड शहरातील डॉ.आंबेडकर अनुयायी जयंती व स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यासाठी येत असताना विविध कार्यक्रम घेण्यासाठी आंबेडकर पुतळ्या परिसरातील जागा अपुरी पडत होती.त्यामुळे डॉ.आंबेडकर अनुयायी यांनी निवेदने देत पाठपुरावा केला.

गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशासक जीवराज डापकर यांच्या आदेशान्वये परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले अतिक्रमण काढल्या मूळे गंगाखेड शहरातील डॉ.आंबेडकरअनुयायांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषद गंगाखेड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकर पुतळा मागील अतिक्रमण काढत परिसरात शिशुभिकरणही केले होते.

नियोजित जागेमध्ये विविध वाहने उभी केल्यामुळे या परिसरात जयंती व स्मृतिदिन कार्यक्रम कार्यक्रम घेणे अवघड होत होते त्यामुळेच नगर परिषदेच्या वतीने आराखड्याप्रमाणे ताराची कुंपण करत पाठीमागील जागा अतिक्रमण मुक्त केली आहे त्याबरोबरच याच परिसरामध्ये बसण्यासाठी गट्टू ची व्यवस्था करत भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमही होऊ शकतात त्यामुळेच डॉ.आंबेडकर अनुयायी यांच्याकडून नगरपरिषदेवर अभिनंदनचा वर्षावही केला आहे.