जि. प.उ.प्रा.शाळा कान्पा येथे जागतिक दिव्यांग दिन समता सप्ताह साजरा

260

✒️संजय बागडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9689865954

नागभीड(दि.12डिसेंबर):-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कान्पा येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाच्या औचित्याने वेगवेगळ्या स्पर्धा, विविध उपक्रम मा. संजय पालवे गटशिक्षणाधिकारी, पं.स.नागभीड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. सदर प्रसंगी दिव्यांगाच्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींविषयी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . सौ.विजया चिडे मुख्याध्यापक जि. प.उच्च प्रा.शाळा कान्पा ,विशेष अतिथी श्रीमती उज्वला मेंढे बॅरिस्टर खोब्रागडे विद्यालय कान्पा प्रमुख अतिथी क्षिशिका सौ. सरला कोरकर , सौ नंदा म्हस्के , श्रीमती रजनी मुठे , रवींद्र उईके कु. छाया विंचूरकर समावेशित तज्ञ व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी घेण्यात आलेले विशेष उपक्रम जसे चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, धावणी रेस, संगीत खुर्ची इत्यादि स्पर्धा घेऊन प्रथम व द्वितीय पारितोषिक देऊन स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन कु. छाया विंचूरकर, समावेशित तज्ञ यांनी केले .तर शाळेचे मा. मुख्याध्यापक व मा. सर्व सहाय्यक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट वितरीत करुन आभार प्रदर्शनाने कु. छाया विंचूरकर स. त. यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.