भारतीय संविधानाच्या कोणी विरोधात आडवे येत असेल तर त्याला आडवे करा – दादासाहेब शेळके

199

🔸ढाणकीत राष्ट्रीय ग्रंथोत्सव सोहळा संपन्न

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

ढाणकी(दि. 18 डिसेंबर):- तालुक्यातील ढाणकी येथे भिम टायगर सेना, भीम टायगर कामगार सेना, भीम टायगर युवा सेना यांच्या वतीने दिनांक 17 रोजी संविधान चौक, महावीर टॉकीज जवळ राष्ट्रीय ग्रंथ उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याकरिता मुंबई येथील प्रसिद्ध भीमगीत गायक अशोक निकाळजे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम रंगला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके होते तर उद्घाटक प्राचार्य मोहनराव मोरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ मराठवाड्यातील अनेक भीम टायगर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादासाहेब यांनी भारतीय संविधाना चे अचूक महत्व सांगून समाज जागृती करण्याचे काम आपल्या मार्गदर्शनातून यावेळी केले.

दादासाहेब म्हणाले की, भारतीय संविधानाच्या विरोधात कोणी आडवे आले तर त्याला आडवे करण्यासाठी आता समाजाने पुढे यावं लागेल…!
“संविधान जिवंत तर आपण जिवंत”…!
तसेच मराठा समाजाला संविधानिक मार्गाने आरक्षण मिळावं त्यासाठी भीम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे.

त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का? लावत नाहीत. बाबासाहेबांचा फोटो उपोषणात आणि कार्यक्रमात लावावाच असा कोणताच कायदा संविधानात नाही.पण नैतिकता म्हणून लावायला पाहिजे होता.कारण ओबीसी या शब्दाचे जनक बाबासाहेब आंबेडकर आहेत.

या देशात ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी अनेक कार्य केलेले आहे पण ते ओबीसी समाजापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचले नाही याची मात्र खंत दादासाहेब शेळके यांनी व्यक्त केली.

असे अनेक विषयांवर सुद्धा दादासाहेबांनी विश्लेषण पूर्व माहिती सांगून अमूल्य मार्गदर्शन केले.प्रसंगी ढाणकी येथील बाळासाहेब चंद्रे कृ.उ.बा.स. सभापती, रामराव गायकवाड माजी जी.प. सदस्य, रुपेश भंडारी काँग्रेस व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष उमरखेड, अमोल तुपेकर काँग्रेस शहराध्यक्ष हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश घोगरे यांनी केले तर आभार भीम टायगर सेना उमरखेड शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी मानले.हा कार्यक्रम शस्वीतेसाठी आयोजक करण भरणे उपजिल्हाप्रमुख भिम टायगर सेना, पिंटू गायकवाड शहराध्यक्ष भीम टायगर कामगार सेना

तसेच ढाणकी नगरपंचायत चे पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड व मित्र मंडळाने अथक परिश्रम घेवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.यावेळी ढाणकी व परिसरातील असंख्य बौद्ध बांधव या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली होती.