पूनम नानाजी कुथे यांना सामाजिक क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार

413

🔸आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वात कमी वयातील पुरस्कार्थीचा विशेष मान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19डिसेंबर):-जागतिक स्तरावर मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या “ग्लोबल इंटरनॅशनल फॉउंडेशन टीम, दिल्ली (G.I.F.T.)” संस्थेमार्फत आयोजित दि.17 डिसेंबर 2023 रोजी रविवारला पवार सभागृह, नागपूर येथे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, पर्यावरण अश्या अनेक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या राज्यातील फक्त 50 व्यक्तींची विशेष निवड करून, त्यांना “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

ह्या सुंदरश्या पुरस्कार सोहळ्यात ब्रह्मपुरीच्या कुमारी.पूनम कुथे, यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्धल “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. मागील 8 वर्षांपासून यांनी चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात अनेक समाजपयोगी उपक्रम राबवीत समाजकार्य केलेले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थी असतांना कुमारी. पूनम नानाजी कुथे यांनी अनेक समविचारी युवकांना एकत्रित करून “न्यु लाईफ बहूउद्देशिय संस्था, ब्रम्हपुरी” ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. त्यामार्फत दरवर्षी वृक्षारोपण, गरजूंना कपडे दान, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर, अनेक आंदोलनात /मोर्च्यात सहभाग, आत्मरक्षा शिबीर, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, महापुरुषांचे जयंती व पुन्यतिथी साजरे करणे, अन्यायाच्या विरोधात निवेदने, आरोग्यविषयक मदत, रक्तदान शिबीर, असे अनेक समाजपयोगी उपक्रम मागील 8 वर्षांत यांनी राबविले आहेत. आणि ह्याआधी सुद्धा यांना अनेक नावाजलेल्या संस्थेमार्फत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, पुरस्कारावर यांनी आपले स्वतःचे नाव कोरले आहे. ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ.मनीषा ठाकरे मॅडम, राजकीय नेत्या सौ.माधुरी पालिवाल मॅडम, श्री.किताबसिंग चौधरी सर, व अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची विशेष उपस्थिती होती.