स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड-जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रीयतेच्या निषेधार्थ प्रेत शासन दारी

110

🔸जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन:- डॉ.गणेश ढवळे

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.26डिसेंबर):-जिल्ह्यातील १३९४ पैकी ६५६ लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची सुविधा नाही तर उर्वरित गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाली असुन पत्रे शेड उडुन गेल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असुन
मृतदेहाची हेळसांड होत आहे.सार्वजनिक स्मशानभूमी नसलेल्या गावात भुमिहिन आणि मागासवर्गीयांना गैरसमजातून अंत्यसंस्कार विधी रोखल्याने गावात वादविवाद होऊन नातेवाईकांनी मृतदेह तहसिल तसेच ग्रामपंचायत कार्यालया समोर आणुन ठिय्या मांडल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत.

शासन आपल्या दारी म्हणत जाहिरातीसाठी कोट्यवधींचा खर्च करणा-या जिल्हा प्रशासनाला अंत्यविधी सारख्या मुलभूत सुविधा स्मशानभूमी बांधण्यासाठी शासन दरबारी आंदोलने करावी लागत असुन हि लज्जास्पद बाब असुन याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘स्मशानभुमी अभावी प्रेत शासन दारी ‘ प्रतिकात्मक लक्ष्यवेधी आंदोलन करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,शेख मुबीन,शिवशर्मा शेलार, शेख मुस्ताक, मिलिंद सरपते, धनंजय सानप आदि. सहभागी होते.

स्मशानभूमी नसलेल्या गावात तातडीने स्मशानभूमी बांधण्यात येऊन मृतदेहाची हेळसांड थांबवावी

गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथे स्मशानभूमीची तातडीने उपाययोजना करण्यात यावी.
—-
गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव १५०० लोकसंख्या असलेल्या गावात भुमिहिनांची जवळपास २० कुटुंबे असुन या लोकांसाठी गावातील सरकारी ओढ्यात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावे लागतात. येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीची सोय नसल्याने दि.२१.१२.२०२३ रोजी तुळशीराम कलेढोण वय ५४ वर्षे यांचा मृतदेह ग्रांमपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न अत्यंत गंभीर ; तातडीने उपाययोजना करून मृतदेहाची अवहेलना थांबवावी
—–
मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न अत्यंत गंभीर असुन अंत्यविधी रोखण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असुन सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. गेल्यावर्षी केज तालुक्यातील सोनेसांगवी(सुर्डी) गावात दि.४ जानेवारी २०२२ रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे वय ६५ वर्षे ,दि.११ एप्रिल २०२२ रोजी नंदुबाई नामदेव थोरात वय ५० वर्षे आणि दि.२६ एप्रिल २०२२ रोजी अंबुबाई काशीनाथ साखरे वय ७५ वर्षे यांचे ४ महिन्यात ३ वेळा मागासवर्गीय महिलांचे अंत्यसंस्कार रोखण्याच्या घटना घडलेल्या आहेत.संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ट्रक्टरमधुन केज तहसिल कार्यालयात आणला होता.त्यानंतर तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यामुळे मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा.

स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अतिक्रमणे हटवावीत

ज्या गावात स्मशानभूमी नाही तेथे ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची जागा नसेल त्यागावात गायरान जमिनीतुन शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी.तसेच काही ठीकाणी अतिक्रमणामुळे रस्ताच नाही तर काही ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवरच
अतिक्रमणे असुन ती हटविण्यात यावीत.