गंगाखेड तालुक्यातील 60 ते 70 टक्के असणारा डोंगरी भाग डोंगरी भाग म्हणून जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन

430

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गांगाखेड(दि.26डिसेंबर):-तहसीलदार गंगाखेड यांच्यामार्फत माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व गिरीशजी महाजन ग्रामीण विकास मंत्री तथा अध्यक्ष डोंगरी भाग विकास उपसमिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आज दिनांक 26 12 2023 मंगळवार रोजी डोंगरी जनपरिषदेच्या वतीने देण्यात आले. गंगाखेड तालुक्यामध्ये 60 ते 70 टक्के डोंगरी भाग असून शासन दरबारी तालुक्यातील डोंगरी भाग डोंगरी भाग म्हणून जाहीर नाही शासनाच्या धोरणानुसार राज्यातील असणारा डोंगरी भाग डोंगरी भाग जाहीर करून डोंगरी भागातील गावांचा डोंगरी भाग विकास योजनेअंतर्गत विकास करून डोंगरी भागातील जनतेचे जीवनमान उंचावून डोंगरी भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणून त्यांचा विकास झाला पाहिजे असे धोरण असताना व गंगाखेड तालुक्यामध्ये 60 ते 70 टक्के डोंगरी भाग असतानाही हा डोंगरी भाग शासन दरबारी जाहीर नसल्यामुळे तालुक्यातील डोंगरी भागात राहणाऱ्या जनतेला हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

डोंगरी भागातील गावांचा विकास झालेला नाही गंगाखेड तालुका डोंगरी भाग घोषित झाल्यावर डोंगरी भाग विकास योजनेअंतर्गत गावांचा प्रचंड असा विकास होऊन डोंगर भागातील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना तीन टक्के शैक्षणिक आरक्षण मिळणार आहे डोंगरी आरक्षणामुळे या भागातील विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेमध्ये व शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरीच्या तीन टक्के डोंगरी आरक्षणामुळे सर्व समाजाच्या मुलांना फायदा मिळणार आहे परंतु गंगाखेड तालुक्यामध्ये भीषण असा डोंगरी भाग असताना 60 ते 70 टक्के असणारा डोंगरी भाग शासन दरबारी जाहीर नसल्यामुळे हा डोंगरी भाग शासनाने डोंगरी भाग म्हणून जाहीर करावा या मागणीचे निवेदन डोंगर भागातील जनतेने डोंगरी जनपरिषदेच्या वतीने आज दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी तहसीलदार महोदय गंगाखेड यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय ग्रामविकास मंत्री तथा अध्यक्ष डोंगरी भाग विकास उप समिती व जिल्हाधिकारी महोदयांना देऊन 23 जानेवारी 2024पर्यंत प्रशासनाने डोंगरी भागाचे सर्वेक्षण करून केलेल्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा.

23 जानेवारी 2024 पर्यंत वरील निर्णय नाही झाल्यास डोंगर भागातील गावागावातील जनता डोंगरी जनपरिषदेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यासमोर दिनांक 23 जानेवारी 2024 पासून एक गाव एक दिवस बेमुदत साखळी उपोषण करणार आहे असे निवेदनाद्वारे शासनास कळवण्यात आले आहे निवेदन देतेवेळी डोंगरी जनपरिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे संयोजक आश्रुबा दत्तराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर दादासाहेब खांडेकर विवेक मुंडे अजय घरजाळे बालासाहेब सोडगीर संतोष दौलतराव मुंडे बालासाहेब किशन मुंडे केशव भेंडेकर रामकृष्ण मुंडे नामदेव सानप व्यंकटी दराडे शंकर रुपनर विनायक दहिफळे दशरथ मोठे साहेबराव पंडित दिनकर मुंडे सिताराम देवकते आदिनाथ घुले अनिल परकड अर्जुन जायभाय रामप्रभू बारगीरे विक्रम इंमडे भास्कर सांगळे विनायक मुरकुटे गोपीनाथ मुंडे नारायण मुंडे भरत शिसोदे रतनसिंग सिसोदे बालासाहेब प्रभाकर सोडगीर दत्तराव आईनीले आधी डोंगरी भागातील असंख्य नागरिक उपस्थित होते