साखरा येथील ग्रामस्थांनी केली ग्रामसेवक सूर्यवंशी यांची तक्रार

568

🔸कामात निव्वळ बोगसपणा ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाईची मागणी

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 27 डिसेंबर):-तालुक्यातील साखरा येथील ग्रामस्थांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी येथील ग्रामपंचायतचे सचिव सूर्यवंशी 15 वा वित्त आयोगातील बंदिस्त नाल्याचे काम स्वतः करीत असून नालीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे.नाली वरील रसल्याची जाडी ही फक्त दोन इंचा पेक्षा कमी आहे.

सदरील नाली वरील स्लॅबची जाडी का कमी आहे.असे ग्रामसेवकाला विचारले असता ग्रामसेवक उडवडीचे उत्तर देत आहे.नालीच्या खाली बेड दोन इंच ते तीन इंच टाकले आहे.कुठेही 80 सोलिंग किंवा 20 एम एम गिटी वापरली नाही.ग्रामसेवक हा गाव विकासासाठी आलेला निधी बोगस काम करून हडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

नालीचे काम बोगसपणे चालू आहे त्याकरिता सदरील कामाची एमबी व सीसी थांबविण्यात यावी. या कामाची ताबडतोब चौकशी लावावी व कामांमध्ये ग्रामसेवक,सरपंच ग्रामपंचायत सदस्य, जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी.अन्यथा वार्ड क्रमांक एक मधील सर्व ग्रामस्थ येऊन पंचायत समिती उमरखेड येथे आमरण उपोषणास बसणार असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.