गेवराई पाडळसिंहून पाथर्डीकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात

626

🔺सुदैवाने जीवितहानी नाही

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.28डिसेंबर):-विशाखापट्टनम-मुंबई या महामार्गावरून गेवराई पाडळसिंहून पाथर्डीकडे भरधाव वेगात आलेल्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.

आष्टी तालुक्यातील दोन महिलांसह तीन पुरुष प्रवासी गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर राक्षस भवन देवदर्शनासाठी गेले होते. मंगळवारी (दि. 26) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे प्रवासी एका कारमधून गेवराई पाडळसिंगीमार्गे पाथर्डीकडे प्रवास करीत असताना सांगवी फाटा ते शिंगरवाडी फाटा दरम्यान गाडी चालकाला झोप लागल्याने गाडी रस्ता सोडून सुमारे दहा ते पंधरा खोल खड्ड्यामध्ये भरधाव वेगात जाऊन पडली. गाडीला वेग अधिक असल्याने खड्ड्यातूनही गाडी समोरच्या चढावरती चढली आणि त्या ठिकाणी असलेल्या पान टपरीला बोरीच्या झाडाला जोराची धडक दिली. या धडकेने गाडीचे मोठे नुकसान झाले असून पान टपरीचाही चक्काचूर झाला आहे. हा अपघात प्रथमदर्शनी पाहता खूप गंभीर वाटत होता मात्र सुदैवाने गाडीतील दोन महिलांसह तीन पुरुष प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत.

अपघातामध्ये गाडीने जोराची धडक दिल्याने मोठा आवाज झाला होता. या आवाजामुळे परिसरातील लोकांनी या अपघात स्थळी धाव घेतली मात्र सुदैवाने यातील प्रवासी सुखरूप बाहेर आल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे.