‘माणगंगा’च्या रुपाने मासाळवाडीच्या माळरानावर ज्ञानगंगाःनितीन दोशी

182

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28डिसेंबर):-माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे आयोजित श्री.संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,प्राचार्य डी.वाय.ओंबासे,डॉ.विकास बाबर,संजय भागवत,राजेंद्र भागवत,संस्थापक अध्यक्ष डॉ.वसंत मासाळ,उपाध्यक्ष सुखदेव मासाळ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन दोशी यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात शैक्षणिक संकुल उभा करून खऱ्या अर्थाने संत गाडगे महाराजाचे विचार गोरगरिब विद्यार्थ्याना शिक्षण शिकवण देवून केला जात आहे असे म्हटले.मासाळवाडीच्या माळरानावर शैक्षणिक संकुल उभा करून ग्रामीण भागात पॅरामेडीकल कॉलेज उभा केले.त्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी स्वावलंबी केले.ते स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. अहिंसा पतसंस्था नेहमीचं शैक्षणिक कामासाठी अग्रेसर राहिली आहे. दोन वर्षापूर्वी येथील विद्यार्थ्याना बसण्यासाठी 15 बेंचची व्यवस्था पतसंस्थेच्या माध्यमातून केली होती,याही पुढे संकुलासाठी भविष्यात लवकरच सुरू होणाऱ्या माणगंगा ज्युनिअर कॉलेजसाठी भरीव आर्थिक मदत केली जाईल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित आय.टी.आय.कॉलेज दहिवडी चे प्राचार्य श्री.ओंबासे यांनी गाडगे बाबा यांच्या विचारांचे अभंग आणि बाबांनी आपल्या आयुष्यात स्वच्छतेबरोबर माणसांच्या मनातील स्वच्छता करून आपण सदविवेक मार्गाने जगू ही शिकवण त्यांनी विद्यार्थ्याना पटवून दिली. त्यांनी संकुला विषयी बोलताना डॉ वसंत मासाळ व सौ सविता मासाळ हे आताच्या काळातील मासाळवाडी व परिसरातील ग्रामस्थांसाठी,विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर अण्णा व लक्ष्मी वहिनी आहेत असे सांगितले.ज्या प्रकारे गाडगे बाबांनी व कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांनी गोरगरिब विद्यार्थ्याना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले त्याचप्रमाणे या भागातील मुलांना व्यवसाय शिक्षण, इंग्रजी माध्यमाची शाळा चांगल्या प्रकारे चालवीत आहेत,त्यांना येथील शिक्षक साथ देत आहेत,असे म्हणाले.

डॉ विकास बाबर यांनी गाडगे महाराज यांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग,त्यांचे विचार,त्यांची तत्वे,त्यांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांचेशी असलेले नाते यातून त्यांनी समाजप्रबोधन करून माणसांच्या मनातील अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रभावी कार्य केले. व्यसनाधीनतेने काय होते याची स्पष्टता केली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.वसंत मासाळ यांनी संस्था गाडगे बाबांनी जे विचार घालुन दिल्या त्या विचारावर चालवण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगितले. मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी मासाळवाडीच्या माळरानावर शैक्षणीक संकुल उभा करून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिलीपासून व्यवसाय शिक्षण DMLT व Radiology Technician चे अभ्यासक्रम शिकवून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.संस्थेला सचिव नारायण मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ यांचेसह मासाळवाडी परिसरातील ग्रामस्थ नेहमीच अग्रेसर करतात.नितीन दोशी यांनी या गावासाठी, संस्थेसाठी नेहमीचं फार मोठ योगदान देत मदत केली आहे,असे आवर्जून सांगितले.

दरम्यान प्रास्ताविक संस्थेचे संचालक व मुख्याध्यापक रावसाहेब मासाळ यांनी अतिशय मार्मिक शब्दात गेल्या १० वर्षाचा अनुवाद केला. कार्यक्रमावेळीकॉलेज व शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांची गाडगे महाराज यांच्या चरित्रावर आधारित भाषणे झाली. लेझीम,ढोल ताशांच्या गजरात पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमासाठी कॉलेजच्या प्राचार्या सौ.सविता मासाळ,उपप्राचार्या श्रध्दा करमाळकर,मुख्याध्यापक रावसाहेब मासाळ, मुख्याध्यापिका सौ.रेश्मा ढेंबरे, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.आभार व सूत्रसंचलन श्री.सजगाने यांनी केले