विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सतत पाठपुरावा करायला हवा

45

🔸आ.डॉ.गुट्टे : गंगाखेड येथे विकासकामांचे लोकार्पण

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29डिसेंबर) :-कोणत्याही भागाचा किंवा गावाचा विकास हा सहज होत नसतो. त्यासाठी नियोजन करून शासनाच्या समोर मागणी ठेवावी लागते. तसेच केवळ मागणी करून उपयोग नाही. तर त्यासाठी सातत्याने लक्ष द्यावे लागते. म्हणजे
विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सतत पाठपुरावा करायला हवा, असे स्पष्ट मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.‌

शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सुवर्णगिरी हॉटेल ते रायगड चौक या दरम्यान पूर्ण झालेल्या सिमेंट रोड व सिमेंट कॉंक्रिट नालीचे लोकार्पण आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत हि विकासकामे मार्गी लागली आहेत.शहरात होत असलेली हि विकासकामे लौकिकात भर घालणारी आहेत. त्यामुळे शहर सुधारणेला चालना मिळत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांना दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध झाली आहे. म्हणून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी पुढे बोलताना सांगितले.

यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, मित्रमंडळाचे शहराध्यक्ष अकबर सय्यद, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, माजी नगरसेवक राजू खान, चाँद शेख, माजी नगरसेवक कलीम शेख, नागनाथ कासले, शहर कार्याध्यक्ष इकबाल चाऊस, उद्धव शिंदे, दीपक तापडिया, सतीशराव घोबाळे, सुमित(छोटू) कामत, संजय पारवे, वैजनाथ टोले, खालेद शेख, स्वप्नील राठोड, राजेश दामा, अरुण सानप, सचिन कवठेकर, संदीप राठोड, राम मिरखे, राजेश राठोड यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.