बीडमध्ये कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळले

627

🔸आरोग्यमंत्र्याची अधिकाऱ्यांसाेबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.29डिसेंबर):-जिल्ह्यात कोरोनाने एंट्री करून आठवडा होत आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून आरटीपीसीआर किटचा तुटवडा असल्याने अँटीजन किटवरच तपासण्या होत आहेत. आरोग्य विभागाकडे केवळ चारशे आरटीपीसीआर किट असल्याने पुरवून – पुरवून तपासण्या करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. दरम्यान, बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हावासीयांना केले आहे.

दरम्यान, बाधा झालेल्या रुग्णांमध्ये कोणता व्हेरियंट आहे, याचे निदान करण्यासाठी रुग्णांचे स्वॅब नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवून तीन दिवस झाले. मात्र, त्याचा अहवालही अद्याप प्राप्त नाही.

रुग्णांमध्ये नेमका कोणता विषाणू आहे, याचीच माहिती नसल्याने आरोग्य विभागानेही उपचाराएवेजी गृहविलगीकरणाचा सल्ला रुग्णांना दिला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे थंडी, थाप, सर्दी, खोकला, घसा खवखव करणे अशा लक्षणांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे मागील सात दिवसांपासून आरोग्य विभागाने अँटीजन व आरटीपीसीआर टेस्ट करायला सुरुवात केली. या सात दिवसांत १४५ आरटीपीसीआर तर ११६८ अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. २८) अँटीजन तपासणीच्या अहवालातून पाच