महागाव पोलीसांचे आशिर्वादाने पोखरी येथे प्रवासी निवारात मटका काउंटर

144

✒️महागाव,तालुका प्रतिनिधी(किशोर राऊत)

महागाव(दि.29डिसेंबर)महागाव पोलीसांचे आशिर्वादाने पोखरी येथे प्रवासी निवारात मटका काउंटर.पोलीस स्टेशन हद्दीतील पोखरी येथे खुलेआम मटका काउंटर सुरू असून महागाव पोलीसांचे आशिर्वादाने या अवैध मटका काउंटर व्यवसायकानी प्रवासी निवारात कब्जा केला आहे. पोखरी हा अवैध धंद्यांचा माहेरघर बनला असून या ठिकाणी जुगार व अवैध मटका व्यवसायकानी चांगलेच बस्तान बसविले आहे. महागाव पोलीसांना दरमहा मिळणाऱ्या मलिद्यामुळे या ठिकाणी अतापर्यंत एकदा या अवैध व्यवसायकावर कारवाई करण्यात येत नसल्याचे येथील नागरीकांमध्ये चर्चा आहे.

पोखरी येथील बसस्टँड परीसरात मटका व्यवसायकानी दोन ठिकाणी काऊंटर सुरू केले असून प्रवाशांना बसण्यासाठी शासनाने बनविलेल्या प्रवासी निवारात या मटका व्यवसायकानी कब्जा केला आहे. यामुळे प्रवाशी महिला,मुली व वृध्दांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, या मटका व्यवसायकानी प्रवासी निवारात केलेल्या अवैध कब्जा मुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे.

या अवैध मटका व जुगाराची येथील तरुण मुलं व शेतकरी आहारी गेले असुन या मुळे नागरीकांचे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर अनेक घरं या मटका व जुगारामुळे उध्वस्त झाली आहे. या ठिकाणी एकदा पोलीसांनी कारवाई केली नसल्याने पोलीसांचे आशिर्वादानेच दिवसरात्र अवैध मटका व जुगार सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे पोखरी येथील मटका काउंटरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे..