दहा दिवशीय उपासक उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे आयोजन

201

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि 30डिसेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्यावतीने मैत्रेय बुद्धविहार लुंबिनीवन परिसर कवडीपुर येथे ५८ व्या दहा दिवसीय उपासक-उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ३जानेवारी ते १२जानेवारी पर्यंत करण्यासंदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मिटिंगचे अध्यक्ष अश्विनीताई उत्तमराव पाईकराव उपस्थित होत्या .तर प्रमुख पाहुणे भारत कांबळे तालुकाध्यक्ष माजी सैनिक , भोलेनाथ कांबळे बौध्दाचार्य माजी जि.प.सदस्य तथा समता सैनिक दल प्रमुख , तुकाराम चौरे बौध्दाचार्य, रंगराव बनसोड, वामनराव कांबळे, रविकांत बनसोड, मोतीराम कांबळे, सुरेंद्र कांबळे, गोविंदराव कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन मीटिंगची सुरुवात करण्यात आली.

ह्या मीटिंगची प्रास्ताविक ल.पु.कांबळे शहराध्यक्ष यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी दहा दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिरासंदर्भात मार्गदर्शन केले.तालुकाध्यक्ष भारत कांबळे यांनी जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता या दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिराकरिता मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका म्हणून लताताई म्हैसकर चंद्रपूर या उपस्थित राहणार आहेत.

या शिबिराचे उद्घाटक म्हणून रवि भगत जिल्हध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत.तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शहर व तालुका कार्यकारणीतील तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी मंडळी उपस्थित राहणार आहेत.या मिटिंगचे सुत्रसंचालन प्रल्हाद खडसे यांनी केले तर आभार विजया शेंडे यांनी मानले.