महाराष्ट्रातील नोकर भरती बंद असल्यामुळे मुलांचे झाले वाटोळे – लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे

142

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30डिसेंबर):- राज्यात गेल्या नऊ वर्षापासून अनुकंपा तत्त्वाची नोकर भरती, आठ वर्षापासून वर्ग तीन व वर्ग चार ची नोकर भरती तसेच 20 20 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग सोडता सर्व विभागाची नोकरी भरती बंद आहे. राज्यात 2 लाख 57 हजार पदे (जागा) रिक्त आहेत. कारण सरकारकडे पगार देण्याची काही सोय नाही. तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही व त्या विदर्भ राज्य झाल्यासच मिळणार आहे.

देशाचे प्रथम कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाचे दरवाजे मोकळे केले होते. परंतु या सरकारने शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचा तिढा हाती घेतल्यामुळे आजच्या मुलाचे नोकरीचे वाटोळे झाले आहे. असे मत ब्रह्मपुरी येथे डॉ. पंजाबराव देशमुख शतकोत्तर जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त व्यक्त केले.. आधुनिक भारतातील कृषी क्रांतीचे जनक व भारताचे प्रथम कृषिमंत्री डाँ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा शतकोत्तर जयंती उत्सव सोहळा ब्रम्हपुरी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अतुलभाऊ देशकर तर सुप्रसिद्ध वक्ते म्हणून दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनायक प्रकाशजी पोहरे व लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य प्रा. डाँ. देविदास जगनाडे, माजी प्राचार्य डाँ. नामदेवराव कोकोडे, प्राचार्य देवेशजी कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी घुबडे पंचायत समिती ब्रम्हपुरी,कार्यक्रमाचे संयोजक व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना ज्ञानेश वाकुडकर यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अनेक संस्था आहेत, अनेक विद्यापीठे आहेत.

आजही त्यांचे कार्य प्रेरणा देत आहेत. भाऊसाहेबांनी दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी समाजकार्य करीत असताना सत्याची बाजू नेहमी घेतली आहे. एवढेच नव्हे तर महापुरुषाच्या जयंती, पुण्यतिथी साजरा करा व महापुरुषाचे विचार जीवनामध्ये आणावे असे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. व अन्य मान्यवरांनी आधुनिक भारतातील कृषी क्रांतीचे जनक व भारताचे प्रथम कृती कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रकाश बगमारे तर संचालन व आभार भगवानजी कन्नाके यांनी केले.