तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा – सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे

121

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.31डिसेंबर):-नववर्षाचे स्वागत करताना नवतरुणांनी व्यसन करू नये. व्यसनामुळे अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहेत. अनेकांचे व्यसनामुळे संसार अक्षरशः उद्धवस्त झाल्याचे उदाहरण आहेत. खरंतर नवतरुणाईने मेहनत करून आपल्या पायावर उभे राहावं आज तरुण युवक मोबाईलच्या माध्यमातून इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप, यांच्यात मग्न झालेला दिसत आहे.

फेसबुक वर महापुरुषांचे आक्षेपार्ह पोस्ट करणे मुलींची छेडछाड करणे हे सर्व चित्र आज आपल्यासमोर दिसत आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलाकडे मुलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपला मुलगा अभ्यास करतो का नाही. आपला मुलगा उशिरा का घरी येतो आपल्या मुलाला व्यसन काही लागलं तर नाही ना या सर्व बाबीकडे आई-वडिलांनी जातीने लक्ष देणे आवश्य आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी केले आहे