केंद्र सरकारच्या नवीन ड्रायव्हर विरोधी हिट अॅन्ड रन कायदा रद्द करा

65

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 2 जानेवारी):- ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ उमरखेड शाखा व्दारे दि. ०३/०१/२०२३ रोज बुधवार चक्काजाम करण्यात येणार आहे.

कारण केंद्र सरकारच्या नवीन ड्रायव्हर विरोधी कायदा हिट अॅन्ड रन भारत न्याय संहिता २०२३ या कायद्याच्या विरोधात उमरखेड तालुक्यातील सर्व ब्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने माहेश्वरी चौक या ठिकाणी सकाळी ११:३० ते १२:०० वाजेपर्यंत चक्का जाम आयोजित करण्यात येत आहे.

या आंदोलनामध्ये ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ यवतमाळ जिल्हा व इत्यादी सर्व विविध ट्रान्सपोर्ट संघटना व सर्व वाहन चालक मिळुन हा चक्काजाम आयोजित करण्यात येईल.

सदरहु चक्काजाम नागपुर, वाशीम, हिंगोली, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ या ठिकाणी सुध्दा होणार आहे.

सदरहू आंदोलन हे शांततेच्या मार्गाने केल्या जाईल.
अशी माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष सगीरे अहमद खान, रहीम खान पठाण, उपाध्यक्ष अ.समद अ.सलाम, कोषाध्यक्ष शेख मुजीब शेख मुस्तफा, शेख अहमद शेख मुस्तफा पटेल, सल्लागार रहीम शेख रहीम शेख महेमुद राज यांच्या ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ उमरखेड चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.