खरसुंडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

68

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6जानेवारी):-अग्रणी सोशल फौंडेशन विटा या संस्थेच्या वतीने साऊ जिजाऊ महोत्सवांतर्गत क्रांतिज्योतीसा वित्रीबाई फुले जयंती खरसुंडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई, जिजामाता,रमाई माता, अहिल्याबाई होळकर यां महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन झाले.

यावेळी महिला हिंसाविरोधी शपथ – रेश्मा भिसे यांनी तर व्यसन मुक्तीची शपथ रोहिणी पुजारी यांनी उपस्थितांना दिली.खरसुंडी येथील बचतगटाच्या महिलांना एकत्रित करून महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ मिनाक्षी पुजारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . त्यांनी किशोरवयीन मुलींना वयात येताना त्यांच्यात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल, मासिक पाळी वेळच्या समस्या, महिलांचे आजार याबाबत विस्तृत माहिती दिली.

त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सारिका भिसे (पंचा.समिती मा. सदस्य) व खरसुंडीचे सरपंच धोंडीराम इंगवले यांनी महिलांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अग्रणी संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब माने,खरसुंडी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य राजाक्का कटरे ताई,नंदिनी केंगार ,जनाबाई केंगार ,विक्रमभाऊ भिसे, तसेच सीआरपी रोहिणी पुजारी, अश्विनी होवाळ,बॅंक सखी रेश्मा भिसे या उपस्थित होत्या.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालिका रिटाताई माने- देशमुख यांनी केले, यावेळी खरसुंडी गावातील विविध समाजातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या .