राममंदिरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणुक करीत आहे म्हणून नागरीकांनी सतर्क रहावे – अॅड. चैतन्य भंडारी

355

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

धुळे(दि.6जानेवारी):-अयोध्या येथे प्रभु श्रीराम विराजमान होण्याअगोदर त्यांच्या नावाने व्हॉटस अॅपवर फार मोठया प्रमाणावर सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना गंडविण्याचा प्रकार सुरु केला आहे.

यात सायबर गुन्हेगार हे नागरीकांना व्हॉटस अॅपव्दारे मॅसेज करतात की, प्रभुश्रीराम मंदिरच्या नावाने अॅप्लीकेशन आले आहे ते डाउनलोड करुन आपण प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याकरीता देणगी देवू शकतात किंवा नागरीकांना असे देखील सूचित करण्यात येते की, आपण अॅप डाउनलोड करुन किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करुन देखील मंदिरा संदर्भातली माहिती आपल्या मोबाईल वर मिळवू शकतात आणि हे सर्व केल्याने आपले मोबाईल हॅक होते किंवा आपले बँक खाते देखील रिकामे होण्याची शक्यता असते व सर्वात महत्वपूर्ण बाब अशी की, प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याच्या नावाने असे कोणतेही अॅप्लीकेशन नाही किंवा त्यांचे कोणतेही पदाधिकारी / अधिकारी नागरीकांना अॅप्लीकेशन करण्यास सांगत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही.

तरी नागरीकांनी जर आपणास असे मॅसेज आले असतील तर त्याला रिपोर्ट करा किंवा त्याकडे दुर्लक्ष करा तसेच दिलेल्या लिंक वर क्लिक करणे टाळा तसेच अॅप्लीकेशन डाउनलोड करणे टाळा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.