युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या उमरखेड तालुका अध्यक्षपदी विजय कदम तर सचिव पदी वसंता नरवाडे यांची निवड

103

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि.7 जानेवारी):-येथील उप माहिती कार्यालय येथे दि. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.सर्वप्रथम पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

त्याच उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहाचे सेवक खलील भाई यांचा विश्रामगृहाच्या मैदानात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे सर्वांवर दुःखाचा गोंधळ डोंगर कोसळल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार सर यांच्या आदेशाने युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या उमरखेड तालुका अध्यक्षपदी लोकहित लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विजय कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर दैनिक जगमित्र न्युज पेपरचे प्रतिनिधी वसंता नरवाडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

तर कोषाध्यक्षपदी दिलीप मुनेश्वर, उपाध्यक्षपदी राजू पिटलेवाड, कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ दिवेकर, सहसचिवपदी अतिश वटाणे, सल्लागारपदी सुहास खंदारे, महिला तालुका अध्यक्षपदी कविता दुथडे, प्रसिद्धी प्रमुखपदी बबलू भालेराव, सह कोषाध्यक्षपदी पिंटू हाके, सह कार्यअध्यक्षपदी उमेश पंडागळे, प्रसारकपदी शेख इरफान शेख इसाक यांची निवड करण्यात आली.सर्व स्तरावरून व तालुक्यातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.