बौद्धाचार्य परिक्षेत जिल्ह्यातुन ल.पु.कांबळे प्रथम

119

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.7जानेवारी):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने ५ नोव्हेंबर २०२३ला संपूर्ण महाराष्ट्र राज्य पातळीवर बौद्धाचार्य लेखी व तोंडी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने दहा परिक्षार्थींनी लेखी व तोंडी परिक्षा दिली होती.

यामध्ये पुसद तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा पुसद शहर शाखेचे अध्यक्ष ल.पु. कांबळे यांनी एकुण गुण२००पैकी १३०गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबदल त्यांचे व दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यवतमाळ जिल्हा शाखाचे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी तसेच जिल्हाध्यक्ष रवी भगत, तथा जिल्हा कार्यकारणी, भारत कांबळे तालुकाध्यक्ष पुसद तथा तालुका व शहर कार्यकारणी आणि समता सैनिक दलाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.