सम्यक बुद्ध विहार येथे जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिवस साजरा

120

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड(दि. 8 जानेवारी):- सम्यक बुद्ध विहार येथे जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंते किर्ती बोधी, महाउपासक शंकरराव दिवेकर आणि नवनिर्वाचित रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. उषाताई संतोष इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. व लगेच त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

भदंत कीर्ती बोधी यांनी पंचशील ध्वजाच्या पाच रंगाबद्दल पंचशील बुद्धध्वज यामध्ये 5 रंग आहेत प्रत्येक रंग कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे. यामध्ये
१) निळा रंगा – शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
२) पिवळा रंग – तेज आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
३) लाल रंग – शौर्य आणि साहसच प्रतीक आहे.
४) पांढरा रंग – पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे.
५) केसरी रंग – त्याग आणि करुणेचे प्रतीक आहेत अशी महत्वपूर्ण माहिती सांगून प्रवचन केले.

यावेळी प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, संतोष इंगोले,उषाताई इंगोले,यशोदाबाई दिवेकर, भारतबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, आनंदाबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, प्रज्ञा दिवेकर, उज्वला धबाले,यशोधरा धबाले, शांताबाई दिवेकर इत्यादी अनेक महिला व बालक बालिका उपस्थित होत्या.