यवतमाळ गॉट टॅलेंट २३-२४ मध्ये वाहुल दोंदल याने पटकावला प्रथम क्रमांक

132

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.8जानेवारी):- उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दोंदल यांचा मुलगा वाहुल (शुभ्रूराजे) दोंदल वय अवघे ६ वर्ष विश्वभारती विद्या मंदिर शाळेमध्ये शिकत असलेल्या वाहुल याने दि. ३ जानेवारी ला जाजू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ६ ते ९ च्या खलील वयोगटात यवतमाळ गॉट टॅलेंट २३ – २०२४ मद्ये सहभागी होऊन आपले टॅलेंट दाखवल्या मुळे वाहुलची निवड झाली होती.

शनिवार दि. ६ जानेवारी ला त्याचे (Grand Finale) फायनल झाले. वाहुल ने गृप ब मध्ये ६ ते ९ च्या खलील वयोगटात वाहुल ने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची बाल शिवाजी भूमिका साकार करून शिवकालीन मर्दानी खेळ लाठीकाठी च्या प्रयोग दाखवून अनेक मुलान मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

आपल्या कलेचे प्रदर्शन करून उपस्थित पालकांना व प्रेक्षकांना बाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेचा विचारात भारावून टाकले. मिळवलेल्या यशा बद्दल वाहुलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या विजयासाठी अथक प्ररिश्रम घेणारे वडील विनोद दोंदल, आई सौ.कीर्ती दोंदल बहीण काश्यपी दोंदल विजयाचे शिल्पकार प्रशिक्षक प्रितम सर सोनवणे शिकत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापिका सौ.मयुरी मॅम देशमुख, शाळेचे सचिव, वर्गशिक्षिका सौ.प्रिया पाटील, खेळ शिक्षक अमोल जयसिंगपूर सर्व शिक्षक वृंद, प्रशिक्षण वर्गातील सवंगडी वाहुल ला वेळोवेळी मार्गदर्शन करीत सहकार्य करीत राहतात,