उमरखेड उपजिल्हा न्यायालयाला पुसद वकील संघाचा स्वार्थापोटी खोडा

176

🔸औदुंबर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कृती समितीचा आरोप

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 10 जानेवारी):-मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेबाबत सर्व चाचपण्या होऊन सोपस्कार पुर्ण झालेले असतांना उमरखेड येथे अति सत्र न्यायालय स्थापन होऊ नये यासाठी पुसद वकील संघाने स्वार्थापोटी आक्रस्ताळेपणा करीत चुकीच्या बाबी मांडून दि 8 जानेवारी रोजी आंदोलन करून खोटी बतावणी व दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला . या बाबीचा निषेध करून औदुंबर अति . जि . व सत्र न्यायालय संघर्ष समितीने उपविभागिय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

हा खटाटोप पुसद वकील संघाने उमरखेड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याबाबत दि .5 ऑक्टोंबर 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. त्या अनुषंगाने उच्च न्यायालय न्यायमुर्तींनी जातीने हजर राहुन स्थळ निरीक्षण करून न्यायालय स्थापनेबाबत सहमती दर्शविली व त्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असतांना पुसद वकील संघाने भारत दुरसंचार निगमच्या जागेच्या इमारतीबाबत आक्षेप घेऊन सदर इमारत ही 100 वर्ष जुनी असून ती पडल्यास पक्षकारांना व वकीलांना जीव गमवावा लागेल अशी खोटी बतावणी केली व काळी (दौ.) ते उमरखेड व धनोडा ते उमरखेड मधील अंतर चुकीचे दर्शवून पुसद वकील संघाने स्वतःच्या स्वार्थापोटी दि 8 जानेवारी रोजी आक्रस्ताळेपणा करीत आंदोलन केले.

वास्तविक पाहता उमरखेड वकील संघ ‘ नगर परिषद महागाव तालुक्यातील नगर पंचायत व 😯 ग्रा.पं चे ठराव तसेच पुसद ते खरबीचे अंतर दर्शविणारा सा.बां विभागाचा दाखला उमरखेड येथून दुपारी 4 नंतर जंगलव्याप्त बंदी भागात बसची फेरी नसल्या बाबतचे आगार प्रमुखाचे प्रमाणपत्र ‘ तसेच उमरखेड तालुका हा दुर्गम डोंगराळ व आदिवासी बहुल असल्या बाबतचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र तसेच हा तालुका अभयारण्याने व्याप्त असल्याचे वनाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र महागाव वकील संघाचे पाठींब्याचे पत्र ‘ यासह उमरखेड व महागाव तालुक्यातील प्रलंबित सत्र खटल्यांची संख्या 750 असल्याबाबतचे प्रमाणपत्र या सर्व बाबींची चाचपणी व शहानिशा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकिय कमिटीने सदर न्यायालयास मंजूरी दिली असतांना पुसद वकील संघाने केवळ स्वार्थापोटी खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबाबत औदुंबर सत्र न्यायालय संघर्ष कृती समितीने निषेध व्यक्त करून याबाबत उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी समितीचे अध्यक्ष अरविंद ओझलवार , सचिव दिपक ठाकरे ‘ महेश काळेश्वरकर , विवेक मुडे , जयशंकर जवणे प्रभाकर दिघेवार मझहर उल्ला खान, विरेन्द्र खंदारे, रसुल पटेल, अरविंद भोयर, शेख जमीर संदीप गाडगे, एडवोकेट बळीराम मुटकुळे, अँड संजय जाधव, वकील संघाचे अध्यक्ष अँड. संतोष आगलावे, सविताताई पाचकोरे, अतुल मादावार जयशंकर जवणे,प्रा विजय गुजरे, प्रभाकर दिघेवार, वसंतराव देशमुख अरुण बेले, अभी ठाकूर,निळकंठ धोबे सह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.