गौतम नगरातील नागरिकांना भोगवटदार पी टी आर ,तसेच त्यांच्या हक्काचे घरकुल देण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन अमरण उपोषण करणार जनसेवक प्रमोद मस्के

161

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11जानेवारी):-उच्च न्यायालय व केंद्र व राज्य सरकारच्या शासन निर्णय च्या आदेशानुसार वन विभाग वगळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय जागेवरील सन दि 1/01/2011 पर्यंतचे अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी व त्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जनशक्ती कृती समितीच्या वतीने आम्ही आमरण उपोषण दिनांक 17 नोव्हेबर 2018 रोजी केले होते.

त्या उपोषणामध्ये आम्हाला मा. उपविभागीय अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन पत्र दिले होते की शासनाच्या आदेशाप्रमाणे समिती स्थापन करून सदरील सर्वेक्षण मोजणीचे काम 30 दिवसात पूर्ण करून त्या पी टी आर चा प्रस्ताव मा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते परंतु ते काम प्रशासनाने केले नसल्याने त्यानंतर आम्ही सन 2019 2021पुन्हा या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण केले होते परंतु राजकीय विरोदामुळे नगरपरिषदचे सह नगररचनाकार गणेश भोकरे यांनी समिती समोर नेत्याचा एकूण चुकीची खोटी माहिती दिल्यामुळे हे काम थांबले आहे आणि गौतम नगराच्या पि टी आर चे व घरकुलचे काम आज रोजी 90 टक्के काम पुर्ण झाले आहे परंतु राजकीय विरोधाभावी हे काम थांबले आहे.

परंतु गौतम नगराचे अतिक्रमण नियमानुकुल करण्याचे काम अधिकाऱ्याने वेळेतच करायचे आहे आणि देशामध्ये व महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्वांसाठी घरे गोरगरीब नागरिकांना त्यांचे हक्काचे घरे देण्यात येत आहेत परंतु गंगाखेड शहरातील गौतम नगरातील नागरिकांना त्यांच्या या हक्काच्या घरकुल पासून वंचित राहावे लागत आहेत आणि अधिकाऱ्याने गौतम नगराच्या भोगवटदार पी टी आर चे काम केले नसल्याने या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे पुन्हा एकदा गौतम नगराच्या भोगवटदार पी टी आर साठी व त्यांच्या हक्काच्या घरकुल साठी जनशक्ती कृती समितीच्या वतीने सर्व नागरिकांना सोबत घेऊन या मागणीसाठी दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी तहसीलदार व जायकवाडीचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे की व गौतम नगराच्या भोगवटदार पी टी आर साठी व त्यांचे घरकुल देण्यासाठी ज्या त्या कार्यालयाचे जे जे कागदपत्र तयार करावा लागत आहेत ते लवकरात लवकर तयार करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घरकुल देण्यात यावे अन्यथा सर्व नागरिकांना घेऊन जनशक्ती कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे यामध्ये काही जीवितहानी झाल्यास याचे सर्व जबाबदार सर्व अधिकारी व प्रशासन राहतील याची नोंद घ्यावी

यावेळी जनसेवक प्रमोद मस्के शेख सलीम भाई सुभाष भालेराव. उत्तम साळवे शेख पाशामीया शेख नजीर भाई नारायण गायकवाड उत्तम सूर्यवंशी रावसाहेब डाके शेख अल्ला बकश भाई शेख शेख रहेमोदीन भाई राहुल गायकवाड शेख रफिक भाई शेख रोपभाई संतोष सावंत दीपक डाके लक्ष्मण एंगडे जानीमिया खुरेशी शेख अब्दुल भाई राजू बनसोडे सुनील साठे शेख कबीर भाई शेख इफ्राज सय्यद सोहेल मुस्तफा खुरेशी आधी गौतम नगरातील 100 एक नागरिक उपस्थित होते