महायुती च्या महा विजयासाठी सर्व मतभेद दूर ठेवून निवडणुकीच्या कामाला लागावे-खासदार अशोक नेते

66

🔸महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा महा मेळावा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.१४ जानेवारी):- मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा महा मेळावा महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.

या महायुतीच्या महामेळाव्याला अध्यक्षीय स्थानावरून खासदार अशोक नेते संबोधित करतांना म्हणाले की, देशाचे विश्व गौरव पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय (आठवले) आर.पी.आय व इतर बारा घटक पक्षाची महायुती निर्माण झाली.भारताला जगात एक नंबरचा स्थान मिळवून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात महायुती ही स्थापना झाली आहे. त्यामुळे सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी,पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, एक दिलाने, एक मनाने, सर्व मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या व देशाच्या भल्यासाठी काम करावे. व महाराष्ट्रात ४५ + पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणण्याचा संकल्प करावा असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.

यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या अनेक विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती व रेल्वे,चिचडोह, कोटगल बँरेजेस, पूल कम बंधारे, उद्योग हे गडचिरोली जिल्ह्याच्या विकास केलेल्या कामाची माहिती खासदार अशोक नेते यांनी सर्व कार्यकर्त्यांना याप्रसंगी दिली.

यासाठी कार्यकर्त्यांनी महायुतीचा विजयाचा संकल्प करण्यासाठी सर्व मतभेद दूर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे.असे प्रतिपादन अध्यक्षीय स्थानावरून महायुतीच्या महामेळाव्याला खासदार अशोक नेते यांनी केले.

याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर माजी केंद्रीय मंत्री मान. सुबोधजी मोहीते,अन्न व औषध प्रशासन मंत्री मान. धर्मरावबाबा आत्राम,आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे,भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार,राष्ट्रवादी क युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक , भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, आठवले गटाचे मेघनाथ घुटके,कवाडे गटाचे भानारकर, शिवसेनाच्या अमिता मडावी, तसेच मोठया संख्येने महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.