मानवतावादी विचारांचा जागर करु या-विश्वास सुतार

44

🔸प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार प्रदान

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.14जानेवारी):-तथागत बुद्धांसह सर्वच महामानवांनी मानवी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. जातीमध्ये बंदिस्त झालेले महामानव आज मुक्त करण्याची गरज आहे. सर्वच माणसांनी विज्ञानवादी बनले पाहिजे यासाठी मानवतावादी विचारांचा जागर करूया असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष विश्वास सुतार यांनी केले. ते भारतीय संविधानिक मूल्यांची जपणूक करणे, लोकशाही तत्वे रुजवणे, वाचन व लेखन संस्कृती वाढविणे, महामानवांचे मानवतावादी विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या एकदिवसीय सहाव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून बोलत होते.

सुरुवातीला उदघाटक ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संमेलनाचे उद्घाटन केले. ॲड. विवेकानंद घाटगे म्हणाले, आज विचार करणाऱ्या माणसांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी हे संमेलन दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नेते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचा या वर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा सहावा धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराला देतांना प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, बुद्धांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी महाराष्ट्रात धम्म विद्यापीठ स्थापन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. धम्म हाच मानवमुक्तीचा मार्ग आहे. त्या वाटेने सर्वांनी जावे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिवसभर चाललेल्या या संमेलनास विजया कांबळे, पूज्य भिक्खू डॉ. यश कश्यपायन महाथेरो, ॲड. अकबर मकानदार, रूपाताई वायदंडे, प्रा. पुष्पलता सकटे, डॉ. शोभा चाळके, आचार्य अमित मेधावी, किशोर खोबरे आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी शर्मिला शानेदिवाण, डॉ. राजश्री खटावकर, सरिता माने, लता पुजारी, काळुराम लांडगे, सुवर्णा तेली, डॉ. रत्ना जवरास, प्रा. देवदत्त सावंत, डॉ. जितेंद्र जळकुटे, संभाजी माने, डॉ. स्वाती सदाकळे, रेखा कांबळे, अमोल खारे, सुधाकर भामरे, कुसूम कांबळे, कविता कांबळे, प्रा. सुमेधा सावळ, अनघा मेश्राम, मोनिका तारमळे, प्रा. राजेंद्र कदम यांना राष्ट्रीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार देऊन तर विकास डावरे, डॉ. संतोष कांबळे, उमेश गाड, प्रकाश लोहार, काळुराम लांडगे, शंकर पुजारी, लक्ष्मण माळी, प्रभाकर कांबळे, डॉ. संदीप गायकवाड यांना सम्राट अशोक विचार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी व लेखक डॉ. अमर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यावेळी नामदेव मोरे, सागर कोळी, दिनकर कांबळे, बाजीराव कटकोळे, अजय सकटे, सुधाकर भामरे, स्वप्नील गोरंबेकर आदी निमंत्रित कवीने आपल्या कविता सादर केल्या.

संमेलनाचे आयोजन अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, सनी गोंधळी, विमल पोखर्णीकर, डॉ. निकिता चांडक, नामदेव मोरे, वृषाली कवठेकर, अनिता गायकवाड, अरहंत मिणचेकर, अनिरुद्ध कांबळे यांनी केले होते. सहाव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनास कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. स्वागत स्वागताध्यक्ष डॉ. स्मिता गिरी, प्रस्ताविक ॲड. करुणा विमल यांनी केले तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर, आभार सनी गोंधळी यांनी मानले.