प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या २०२४ दिनदर्शिकेचे प्रकाशन

59

🔸आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते

✒️सोलापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सोलापूर-अकलूज(दि.17जानेवारी):-मकरसंक्राती निमित्त शिवरत्न बंगला शंकरनगर येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. रणजितसिंह मोहिते पाटील नेते धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, डॉटर मॉमच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, जिल्हा सचिव प्रमोद राऊत, माळशिरस तालुका उपाध्यक्ष किरण येडगे, माळशिरस शहर सहसचिव अजित येडगे, टेंभुर्णी शहर अध्यक्ष गणेश घाडगे, इंदापूर शहराध्यक्ष सोहेल बागवान, अजय शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीने २०२४ ची दिनदर्शिका प्रकाशित केल्याने संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.