भाजप महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने दिनांक २९ व ३० जानेवारी रोजी महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन

73

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19जानेवारी):- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजप महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने दिनांक २९ व ३० जानेवारी ला सकाळी ११ वा. आमदार निवास नवीन वाडा,चिमूर येथे भव्य महिला कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

भांगडिया फाउंडेशन च्या संचालिका सौ अपर्णाताई
भांगडिया यांचे कडून प्रथम बक्षीस रोख २५हजार रुपये, द्वितीय बक्षीस रोख २० हजार रुपये, तृतीय बक्षीस १५ हजार रुपये प्रायोजित केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, उदघाटक नगर परिषदच्या मुख्याधिकारी डॉ सुप्रिया राठोड तर प्रमुख अतिथी भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार, भांगडिया फाउंडेशनच्या संचालिका सौ मेघाताई भांगडिया, सौ अपर्णाताई भांगडिया, सौ आरतीताई भांगडिया, माजी नप अध्यक्ष सौ शिल्पाताई राचलवार,भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर , उपस्थित राहणार आहे.

महिला कबड्डी संघानी सहभागी होण्याचे आवाहन सौ. मायाताई ननावरे, सौ गीता लिंगायत, सौ आशा मेश्राम, सौ भारती गोडे, सौ वर्षा शेंडे, सौ वर्षा लोणारकर, सौ दुर्गा सातपुते, सौ अरुणा ननावरे, सौ रत्नमाला मेश्राम, सौ छाया कंचर्लावार, सौ ललिता चौधरी, सौ निता लांडगे, सौ अनुराधा बोरकर, सौ छबू आत्राम, सौ प्रतिभा गेजिक, सौ नलिनी लांडे, सौ कल्याणी सातपुते, सौ प्रिया जयकर, सौ अलका बोरतवार, नाझमा शेख, नसिमा शेख, सौ पुष्पा हरणे, सौ मंजुषा मुंगले, सौ दीपाली बानकर, सौ मंजुषा ठोबरे, सौ योगिता गोहने, सौ रंजना खेडकर, सुनीता जाभुळे, सौ रोहिणी नवघडे यांनी केले आहे.